शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 21 डिसेंबर 2009 (12:52 IST)

ओबीसी करणार 1,500 कर्मचाऱ्यांची भरती

ओरियंटल बँक (ओबीसी) आगामी वर्षभरात आपल्या विविध शाखांमध्ये 1, 500 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. बँकेने मागील वर्षात 1,427 जणांची भरती केली होती.

बँकेचे कार्यकारी संचालक एस सी सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेच्या विविध शाखांमध्ये कामाचे दडपड वाढत असल्याने बँकेने भरतीचा निर्णय घेतला असून, लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

बँक हॉंगकॉंगमध्ये नवीन शाखा सुरू करणार असून, यासाठीही भरती करण्याचा विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.