शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: दिल्ली , गुरूवार, 16 जून 2016 (15:42 IST)

पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

पेट्रोलचे दर प्रति लिटर पाच पैशांनी वाढलं असून डिझेल प्रति लिटर 1.26 रुपयांनी महागलं आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे.
देशात 1 जूनपासून कृषी कल्याण सेस लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व्हिस टॅक्स 14.5 टक्क्यांवरुन 15 टक्के झाला आहे.

यापूर्वी 1 जून रोजी पेट्रोल 2.58 रुपये आणि डिझेल 2.26 रुपयांनी महागलं होतं.  तर त्या याआधी 17 मे रोजी पेट्रोल 0.83 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 1.26 रुपये प्रति लिटर महागलं होतं. तर 30 एप्रिलला पेट्रोलचे दर प्रति लिटर 1.06 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 2.94 रुपयांनी  वधारले होते. तसंच 5 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते.