शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 18 जानेवारी 2012 (14:32 IST)

मारुतीच्या किंमतीत वाढ!

सर्वसामान्यांची गाडी म्हणून ओळखली जाणारी मारूती सोमवारपासून महागली असून कंपनीने विविध मॉडेल्सच्या किमतीमध्ये १७ हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

मारुती सुझुकी इंडिया मारुती 800 ते महागडी कार किजाशी यासारख्या मॉडेलची विक्री करते. मारुती 800 ची किंमत 1.97 लाख रुपयांपासून सुरू होते. किजाशीची किंमत 17.5 लाख रुपये आहे. डिझायर या मोटारीचे नवीन मॉडेल पुढील महिन्यात बाजारात येत आहे. त्यामुळे या मॉडेलच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या वाढीपूर्वी एसएक्स-4 स्वेडनची किंमत 7 लाख ते 9.11 दरम्यान होती, तर स्वीफ्टचे डिझेल मॉडेल 5.27 लाख ते 6.47 लाख रुपयांत उपलब्ध होते. मारुतीच्या ऑल्टो या मॉडेलची सर्वाधिक विक्री होते. ही गाडी आता 4 हजार रुपयांनी महागली आहे. आधी ही कार 2.32 लाख ते 3.31 लाख रुपये दरम्यान होती.