शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वेबदुनिया|

मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत, मित्तल दुसरे

WD
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पुन्हा एकदा सर्वात श्रीमंत भारतीय ठरले आहेत. त्यांच्याकडे 18.9 अब्ज डॉलर्स (सुमारे 1 लाख 16,064.9 कोटी रुपये) वैयक्तिक संपत्ती आहे. चीनमधील हुरून इंडिया रिच लिस्टनुसार यंदा संपत्तीत 2 टक्कयांची घट येऊनही अंबानी अव्वल ठरले.

लंडनस्थित स्टीलसम्राट लक्ष्मी मित्तल 15.9 अब्ज डॉलर्स (97 हजार 641.9 कोटी रु.) संपत्तीसह दुसर्‍या क्रमांकावर आहेत. सन फार्मास्युटिकल्सचे संस्थापक दिलीप शांघवी तिसर्‍या स्थानी आहेत. विप्रोचे अझीम प्रेमजी चौथ्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती 12 अब्ज डॉलर्स आहे. 8.6 अब्ज डॉलर्ससह एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शिव नादर पाचव्या, ग्रासिम इंडस्ट्रीजचे कुमारमंगलम बिर्ला (8.4 अब्ज डॉलर्स) सहाव्या, गोदरेज समूहाचे आदी गोदरेज (8.1 अब्ज डॉलर्स) सातव्या स्थानी आहेत