शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (10:23 IST)

रेल्वे कर्मचार्‍यांना 78 दिवसांचा बोनस, मागच्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट रक्कम

सरकारने बुधवारी रेल्वे कर्मचार्‍यांसाठी उत्पादकतेेशी निगडित 78 दिवसांच्या बोनसाची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावड़ेकर यांनी मीडियाला सांगितले की रेल्वे कर्मचार्‍यांना सण उत्सवाअगोदर 78 दिवसांचा बोनस देण्यात येईल. सणासुदी अगोदर सरकारने बुधवारी रेल कर्मचार्‍यांना 78 दिवसाच्या पगाराबरोबर उत्पादकतेशी संबंधीत बोनस देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल आहे. हा लागोपाठ पाचवा वर्ष आहे, जेव्हा रेल्वे कर्मचार्‍यांना या स्तरारचा बोनस मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे बोनस  दसर्‍याचा आधी मिळणार आहे.  
 
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, कॅबिनेटने वर्ष २०१५-१६ च्या उत्पादकतेशी संबंधीत ७८ दिवसांचा बोनस देण्यास मंजुरी दिली आहे. मागील चार वर्षापासून रेल्वे कर्मचाऱ्यांना इतकाच बोनस मिळत आला आहे. दसऱ्याच्या आधी रेल्वेच्या १२ लाख कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी उत्पादकतेशी संबंधीत बोनस दिला जातो.  
रेल्वे आर्थिक संकटात असूनही रेल्वेने कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. बोनसासाठी रेल्वेला २ हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.