testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तुम्ही विसराळू आहात का?

प्रा. राजा आकाश

वेबदुनिया|
आपणच ठेवलेल्या वस्तू नेमक्या कुठे ठेवल्या ते आपल्याला आठवत नाही. आपण ठरवलेली महत्वाची कामं आपल्याला दिवसभर आठवत नाहीत, पण रात्री झोपताना आठवतात. ते इतकं महत्वाचं काम करायला आपण विसरलो म्हणून हळहळत बसतो.

आपल्या स्मरणशक्तीला दोष देतो. अनेक गोष्टी आपल्याला हव्या तेव्हा आठवत नाही म्हणून आपलं बरचं नुकसान होतं व आपण हतबल होत जातो. विज्ञानातीलं संशोधनं असं सांगतात की मानवी मेंदूची क्षमता ही स्नायूंसारखी असते. स्नायू जसे विशिष्ट व्यायाम करून विकसित करता येतात, त्यांची क्षमता वाढवता येते, त्याच पद्धतीने माणसाच्या मेंदूची क्षमतादेखिल विशिष्ठ तंत्र वापरून व सराव करून वाढवता येते.
'वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप' जिंकणारा डॉम्निक ओब्रायन नावाचा ४० वर्षाचा माणूस केवळ ५ मिनिटांमध्ये २४० आकडे अचूक लक्षात ठेवतो व केवळ ४२ सेकंदात ५२ पत्यांचा सिक्वेन्स एकही चूक न करता लक्षात ठेवतो. ओब्रायनला लोक विचारतात की तुझ्यात ही क्षमता कुठून आली तेव्हा तो म्हणतो की ही क्षमता माझ्यात जन्मजात नाही.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घेतलेल्या प्रशिक्षणामुळे हे साध्य झाले आहे. जे स्वतःची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी व टिकवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात त्यांची स्मरणशक्ती वृद्धावस्थेतही कुशाग्र राहते. १४ वर्षाखालील सुमारे ३२ टक्के मुलांना स्मरणशक्ती वाढवण्याचे तंत्र शिकवले जाते.
आजच्या काळात सतत माहितीचा ओघ आपल्यापर्यंत येत असताना स्मरणशक्ती वाढविणे या गोष्टीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जो आपल्या स्मरणशक्तीचे कौशल्य सिद्ध करतो तो नेहमीच सर्वांच्या पुढे जातो. आपली परिक्षापद्धतही स्मरणशक्तीच्या क्षमतेवर आधारलेली आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे प्रगती जर करायची असेल तर आपल्याला स्मरणशक्ती जास्तीत जास्त वाढवावी लागेल.
(लेखक नागपूरमधील नामवंत कंसल्टंट सायकॉलॉजिस्ट आहेत.)


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

धूम्रपान सोडवण्यासाठी हे पदार्थ दररोज खा

national news
लोक धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी अनेक उपाय करतात. मात्र, घरातीलच काही उपयांनी तुम्ही ...

प्रत्येक आजारांवर सोपे उपाय

national news
कैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...

रोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज

national news
भरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...

पनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो

national news
दररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...

काय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत

national news
लहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...