testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'डोण्ट वरी बी हॅप्पी', व 'कट्यार काळजात घुसली' ने मारली बाजी

ashok saraf
Last Modified सोमवार, 25 एप्रिल 2016 (17:25 IST)
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कलागौरव पुरस्कार


फाउंडेशन प्रस्तुत हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच गोरेगाव येथील नेस्को मैदानात दिमाखात पार पडला. यात 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने, तर 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाने बाजी मारली. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संस्कृती कलादर्पणचा
सर्वश्रेष्ठ
कलागौरव या पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराने मी पुन्हा एकदा रसिकांच्या ओझ्याखाली दबलो गेलो असल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले. 'या पुरस्कारासाठी माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ४५ वर्ष अभिनय कारकिर्दीमध्ये रसिकांनी मला अमाप प्रेम दिले. त्याबद्दल प्रेक्षकांचे मी आभार मानतो. या पुरस्कारामुळे मी ओझ्याखाली दबलो गेलो असून, आजही रसिक मायबाप मला पसंत करतात हे मी माझे भाग्य समजतो' अशी भावना अशोक सराफ यांनी
पुरस्कार घेताना व्यक्त केली.
संस्कृती कलादर्पण अध्यक्षा अर्चना नेवरेकर व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा गौरव करण्यात आला. यांसोबतच संस्कृती कलादर्पण सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलावंत मंडळी उपस्थित होती.
यंदा नाटक-चित्रपट आणि मालिका अशा तीन वेगवेगळ्या
विभागात पुरस्कार देण्यात आले. त्यातील नाटक विभागात डोण्ट वरी बी हॅप्पी, चित्रपट विभागात कट्यार काळजात घुसली आणि मालिका विभागात 'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकेने सर्वोत्कृष्ट होण्याचा मान मिळवला. नाटक विभागातील सर्वोत्कृष्ट नेपथ्य, प्रकाश योजना आणि संगीत अशा तीन पुरस्कारांवर 'तिन्ही सांज' या संगीत नाट्याने आपले नाव कोरले. तसेच ऑल दी बेस्ट २, दोन स्पेशल, परफेक्ट मिस मेच आणी शेवग्याच्या शेंगा या नाटकांनी प्रत्येकी दोन पुरस्कारांवर मोहर उमटवली. शिवाय चित्रपट विभागात लोकांच्या पसंतीला उतरलेल्या 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक, छायांकन, गीतरचना, पार्श्वगायक, संवाद, दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट अशा सर्वाधिक ९ पुरस्कारांवर आपले नाव कोरले. शिवाय मराठी चित्रपट सृष्टीतले अष्टपैलू अभिनेता सचिन पिळगावकर यांना 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी मानाचा मुजरा या विशेष पुरस्काराने नावाजले गेले. चित्रपट विभागातील विविध पुरस्कारांसाठी नटसम्राट या चित्रपटाला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर कोतीला लक्षवेधी पुरस्कार प्राप्त झाला आहे, तसेच
'नटसम्राट' मधील भूमिकेसाठी विक्रम
गोखले यांस विशेष ज्युरी पुरस्कार तर
ज्येष्ठ अभिनेते
नाना पाटेकर यांना
अभिनय सम्राट हा पुरस्कार
देण्यात आला.


मालिका विभागात तितिक्षा तावडे हिला सर्वोत्कृष्ट पदार्पण तर मृणाल दुसानीसला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तसेच वैभव चिंचाळकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
शिवाय यंदाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेता स्वप्नील जोशीला यावर्षीचा फेस ऑफ द इयर तर मानसी नाईकला स्टायल आयकॉन या पुरस्कारांनी नावाजण्यात आले.

संस्कृती कलादर्पण रजनी २०१६ नाट्य आणि चित्रपट पुरस्काराचे हे १६ वे
वर्ष अनेक बाबींने विशेष ठरला. कलाकारांच्या कलागुणांचा गौरव तसेच मनोरंजन तथा मनोरंजन पलीकडे जाऊन कार्य करणा-या या पुरस्कार सोहळ्यात १ लाख ६१ हजार रुपयांचा धनादेश अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडे 'नाम फाउंडेशन' साठी देण्यात आला. तसेच यावर्षी वृत्तवाहिनी विभागात महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार
जयंत पवार यांना पत्रकारितेचा पुरस्कार मिळाला असून, ए बी पी माझा या वृत्तवाहिनीला सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनीचा पुरस्कार बहाल करण्यात आला. तसेच आय.बी. एन. लोकमतचे अमोल परचुरे आणि नीलिमा कुलकर्णीला सर्वोत्कृष्ट सूत्रधार पुरस्काराने नावाजण्यात आले. गेली १६ वर्षे होत असलेल्या सोहळ्याचा थाट यंदाही कायम होता. कलावंतांच्या धमाल परफॉर्मन्समुळे सोहळ्याला चारचाँद लागले. अभिजीत खांडकेकरच्या सुत्रासंचालनात बहार आणण्यासाठी योगेश शिरसाट आणि प्राजक्ता हनमघर
यांच्या खुमासदार विनोदांनी महत्वाची कामगिरी केली.


यावर अधिक वाचा :

सैफ अली खान बनणार नागा साधू

national news
सैफ अली खानची नवीन वेब सिरीज 'द सॅक्रीड गेम्स' सध्या वेगवेगळ्या कारणामुंळे चर्चेत आहे. या ...

'धडक'चा क्लायमॅक्स जान्हवीकडून लीक ?

national news
अभिनेत्री जान्हवीला 'धडक'च्या क्लायमॅक्सबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं याची कल्पना ...

नवरा-बायकोचं भांडण

national news
नवरा-बायकोचं भांडण होतं. बायको - (रागाने) ते माझे आवडते तीन शब्द म्हण. नवरा - आय लव्ह ...

अक्षय कुमार माझा रोल मॉडेल

national news
अक्षय कुमारबरोबर 'टॉयलेट एक प्रेमकथा'मध्ये काम केलेली भूमी पेडणेकर अक्षयलाच आपला रोल ...

'ओम' नाही 'ओ' ची महिमा

national news
ब्रह्मचारी बाबा सांगतात ओम शब्दाच्या उच्चाराने मेंदूच्या काही नसा जागृत होतात... पण ...