बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जानेवारी 2022 (12:37 IST)

रोहित आणि जुईलीच्या लग्नाचे फोटो पाहा

मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असून आणखी एका जोडप्याचा लग्नसोहळा नुकताच पार पडला आहे. 23 जानेवारी 2022 रोजी रोहित आणि जुईली या दोघांचा लग्न सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. लग्नातील गोड क्षणाचे काही सुंदर फोटो जुईलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
 
पुण्याच्या ढेपेवाडीत हा लग्नसोहळा अत्यंत पारंपारिक पद्धतीने पार पडला आहे. लग्नसोहळ्यात रोहित आणि जुईलीने पारंपारिक पेहराव केला होता. 
 
जुईलीने जांभळ्या रंगाची नऊवारी नेसली तर रोहितने जांभळ्या रंगाचे धोतर आणि फिकट जांभळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. जुईलीने सोबत पारंपारिक दागिने घातले आहेत. 
 
दोघांचे फोटो पाहून सोशल मिडीयावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.