मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

आरती सोळंकी बिग बॉस च्या घरातून बाहेर

बिग बॉस मराठीची स्‍पर्धक अभिनेत्री, कॉमेडियन आरती सोळंकीला बेघर झाली आहे. मागच्‍या आठवड्‍यातचं बिग बॉसच्‍या घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धकांचं नामांकन करण्यात आलं होतं. त्‍यात आरती सोळंकीला सर्वांत कमी मतदान झाले . 
 
मागच्‍या आठवड्यात ग्‍लॅमरस अभिनेत्री स्मिता गोंदकर, ऋजुता धर्माधिकारी, ज्‍येष्‍ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अनिल थत्ते, भूषण कडू यांचे नॉमिनेशन झाले होते. पैकी स्मिता गोंदकर आणि ऋजुता धर्माधिकारी हे दोघे एलिमेनेशन राउंडमधून बचावले होते. महेश मांजरेकर यांनी तसं जाहीरही केलं होतं. त्यामुळे रविवारझालेल्‍या एपिसोडमध्ये उर्वरित स्पर्धकांपैकी कोण बेघर होणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.