शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2019 (16:26 IST)

अभिजितची रवानगी थेट न्यायलयीन कोठडीत

बिग बॉस मराठी सिझन 2मधील अभिजित बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायलयाने मोठा निर्णय दिला आहे. बिग बॉसच्या सेटवरुन अटक करण्यात आलेल्या अभिजीत बिचुकलेंना चेक बाऊन्स प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र खंडणी प्रकरणात मात्र त्याला जामीन नामंजूर केला आहे. बिचुकलेंना एका चेक बाऊन्स प्रकरणात पोलिसांनी बिग बॉस मराठीच्या सेटवरुन अटक केली होती. याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायलयात हजर केले गेले. त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र अभिजित बिचुकलेला खंडणी प्रकरणी जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. त्यामुळे बिचुकलेंची रवानगी बिग बॉसच्या घरातून थेट न्यायलयीन कोठडीत करण्यात आली आहे.