सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

सचिन दिगदर्शित करणार 'अशी ही आशिकी'

1989 साली सचिन यांनी अशी ही बनवा बनवी नावाचा भन्नाट विनोदी चित्रपट बनवला होता. सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी केलेली धमाल प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. साधरणपणे वर्षभराने आशिकी नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील संगीताने हा चित्रपट सुपरहिट केला होता. 2013 साली त्याचा सीक्वल आशिकी-2 आला आणि तो ही प्रेक्षकांनी उचलून धरला. आता आशिकी-3 वाटेवर आहे. याच मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या नावाची सांगड घालत सचिन पिळगावकरांच्या आगामी चित्रटाचं नामकरण झालं अशी ही आशिकी.
 
काही दिवसांपूर्वीच सचिनचा साठवा वाढदिवस होता. तो साजरा करत असताना त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली. नावावरुन कल्पना आलीच असेल की हा चित्रपट प्रेम या विषयावर असणार. अजून एक सरप्राइज देत पिळगावकरांनी चित्रपटाच्या नायकाचं नाव जाहीर केलं. अभिनय बेर्डे, त्यांचा जिवलग मित्र लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा. साधरण चारेक वर्षांनी सचिनजी दिग्दर्शकाची हॅट डोक्यावर चढवणार आहेत.