1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2019 (09:10 IST)

अभिनेत्री माधुरी दीक्षितचा चित्रपट नेटफ्लिक्सवर

Actress Madhuri Dixit's movie is on Netflix
अभिनेत्री माधुरी दीक्षित नेटफ्लिक्सवर तिचा चित्रपट घेऊन येत आहे. ‘फायरब्रँड’नंतर हा नेटफ्लिकचा दुसरा ओरिजिनल मराठी चित्रपट आहे. ‘१५ ऑगस्ट’असं चित्रपटाचं नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
 
चित्रपटात एका चाळीत राहणाऱ्या सामान्यांची कथा दाखवण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी चाळीत सुरू असलेली तयारी, त्यातच आपल्या प्रेमाला मिळवताना एका तरुणासमोर उभ्या असलेल्या समस्या आणि त्याला यातून बाहेर काढण्यासाठी कशाप्रकारे चाळीतले लोक एकत्र येतात, हे एका दिवसाच्या कथेतून अधोरेखित करण्यात आले आहे. यामध्ये स्वप्ननील जयकर, राहुल पेठे, मृण्मयी देशपांडे, वैभव मांगले, आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.