रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2024 (16:32 IST)

सर्वोच्च न्यायालयाकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयने जारी केलेले लुक आउट परिपत्रक आता रद्दच राहणार आहे.रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ आणि वडील यांच्या विरोधात सीबीआयने जारी केलेल्या लूक आऊट परिपत्रकाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
आज सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे अपील फेटाळून लावले. त्यामुळे रिया आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.ऑगस्ट 2020 मध्ये, रिया, तिचा भाऊ, तिचे वडील आणि तिची आई यांच्याविरुद्ध लूक आउट परिपत्रक जारी करण्यात आले होते. सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी बिहारमधील पाटणा येथे गुन्हा दाखल करून त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. हे प्रकरण नंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात आले.रियाचे कुटुंबीय उच्च न्यायालयात पोहोचले होते. रियाच्या याचिकेवर हायकोर्टाने लुक आऊट सर्कुलर रद्द केले होते.
 
34 वर्षीय अभिनेता सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020रोजी त्याच्या वांद्रे अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.सुशांतने किस देश में है मेरा दिल सारख्या शोमधून टेलिव्हिजनमधील आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि एकता कपूरच्या पवित्र रिश्ता मधील भूमिकेमुळे तो प्रसिद्ध झाला
Edited By - Priya Dixit