Widgets Magazine
Widgets Magazine

‘अग्निपंख’ सिनेमाचा टीजर

agnipankh

‘अग्निपंख’या सिनेमाचा टीजर पोस्टर नुकताच फेसबुकवर प्रदर्शित झाला. हॉलीवूडपट वाटावा असा हा पोस्टर मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. फायर ब्रिगेडवर आधारीत बीग बजेट सिनेमावर काम सुरू असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. आता हा पोस्टर पाहून या सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘विटीदांडू’ या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक गणेश कदम यांचा ‘अग्निपंख’हा ड्रीमप्रोजेक्ट आहे.
 
महाकाय अग्नितांडव असो...भूकंप असो वा महाप्रलय, मनुष्यजीवासह प्राणी-पक्ष्यांचेही जीव वाचविण्याचे कार्य अग्निशमन दल प्रतिकुल परीस्थितीत करत असते. उन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता अग्निशामक जवानांची अग्नि आणि जीवसुरक्षेप्रती असलेली निष्ठा वेळोवेळी अधोरेखित झाली आहे. अशा कर्तव्यनिष्ठ अगिनिशमन दलाचा संघर्ष एका जबरदस्त थरारक आणि रोमांचकारी घटनेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
 
“अग्निशमन दलावरचा हा पहिला भारतीय ॲक्शनपट आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेतंत्रज्ञांचा सहभाग हि या चित्रपटाची जमेची बाजू आहे. त्यामुळे ‘अग्निपंख’ मराठी प्रेक्षकांसाठी व्हीज्युअल ट्रीट असणार आहे.” असा विश्वास दिग्दर्शक गणेश कदम यांनी व्यक्त केला.
 
“अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राफिक्स मुळे चित्रपटाचं बजेट मोठं असलं तरी कसलीही कसर बाकी न ठेवता दृश्यानुभव उच्च प्रतीचा राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. अग्निशमन दलाच्या सर्वात कठीण, श्वास रोखून ठेवणाऱ्या मोहिमेचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.” असे मत निर्माते रुतुजा बजाज आणि अनिल गायकवाड यांनी व्यक्त केले.
 
या चित्रपटातील कलाकार कोण?  या प्रश्नाचे उत्तर अजुनही गुलदस्त्यात आहे. ‘अग्निपंख’ची कथा गणेश कदम यांची असून पटकथा सचिन दरेकर यांनी लिहिली आहे. ‘रीतू फिल्म कट’ निर्मित ‘अग्निपंख’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

जगण्याशी असलेला संघर्ष दाखवणारा बंदूक्या

'वादळवाट' 'घडलंय बिघडलंय' यासारख्या विविध प्रकारच्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप ...

news

भिकारी सिनेमातील 'मागू कसा मी' गाण्याचे बनले प्रॅक्टीस सॉंग

मी मराठा फिल्म प्रॉडक्शनचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच जीसिम्सचे ...

news

विशाल भारद्वाज यांच्या हस्ते 'ड्राय डे' चे मुझिक लाँच

आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय ...

news

जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पहिल्यांदाच बेवसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस

रोहिणी हट्टंगडी हे नाव अख्ख्या चित्रपट सृष्टीला माहित आहे. हिंदी-मराठी फिल्म्स, सिरियल्स, ...

Widgets Magazine