testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अमृता फडणवीस यांची नवी इनिंग

Amruta Fadnavis
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आता आपल्या नव्या इनिंगला सुरूवात करत आहेत. सर्वात आधी गायन क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर आता राजकुमार शेंडगे दिग्दर्शित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या महिला सक्षमीकरणाच्या अभियानावर आधारित बाहुभाषिक चित्रपटाला अमृता फडणवीस या संगीत देणार आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईस ओव्हर करणार आहेत. या चित्रपटाचे नाव 'अ ब क' असे असेल.
हा चित्रपट भारतातील सुमारे 14 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. अमिताभ बच्चन, चिरंजीवी यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेते यामध्ये छोट्या भूमिकेत दिसतील. देशातील प्रत्येक शाळेत हा चित्रपट दाखवला जाणार असल्याचे वृत्त आघाडीच्या वर्तमानपत्राने दिले आहे. या चित्रपटामध्ये ऑस्करमध्ये नामांकन मिळालेल्या लायन या चित्रपटातील बालकलाकार सनी पवार याची महत्त्वाची भूमिका असेल. हा चित्रपट नेमका कसा असेल याबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा ताणली आहे.


यावर अधिक वाचा :