testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मला माझा आवाज ऐकण्याची दृष्टी अनहद नाद नाटकाने दिली आहे....

anhad marathi natak
Last Modified गुरूवार, 9 नोव्हेंबर 2017 (11:44 IST)
नाटक "अनहद नाद - " हे मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक . सांस्कृतिक चेतने साठी प्रतिबद्द असणारं हे नाटक कलाकारांना कोणतेहीcompromised न करता आपल्या तत्वाने जगण्याची प्रेरणा देते. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे रंगभूमीवर हे नाटक एक क्रांतिच्या दिशेने पाऊल टाकत आहे. जसं , रंगभूमीवर हे नाटक,
मे 2015 ला आले. आपण 2015 पासून पाहिलं तर रंगभूमीवर येणाऱ्या नाटकांची नावे ही अनहद नाद नाटकाच्या समांतर असल्याचे दिसून येते . 2015 च्या अगोदर असणाऱ्या मराठी नाटकांची नावे ही खूप वेगळी असायची. 2015 नंतर ही नावे बदलू लागली आहेत. हे आपल्याला रंगभूमीवर पहायला मिळते . कलेसाठी प्रतिबद्द असणार हे नाटक, कलाकारांना कलेवर कशा पद्धतीने जीवन जगता येईल हा सर्वव्यापक दृष्टिकोन कला उदयोजकतेच्या माध्यमातून रंगभूमीला दिला आहे . हे नाटक प्रोड्युसर नसतानाही आपल्या रंगभूमीवर आपल्या कलात्मकतेसाठी प्रसिद्ध आहे . कलाकार ठरवतात आणि या नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर होतात . ते प्रयोग कलाकार स्वतः ठरवतात.
"अनहद नाद - unheard sounds of universe " हे नाटक गर्दीची मानसिकता तोडून एक सक्षम आणि वैचारिक कलाकार म्हणून व्यक्तीला निर्माण करतो . अनहद नाद नाटकातील विचार कलाकार आपल्या कलात्मक शारीरिक आकृत्यांद्वारे सादर करत असतात . विचार व
शरीर एकाच वेळी performance
होत असताना पहायला मिळतात. शब्दांचं conviction आणि त्याची सर्वभौमिक व्यापकता एवढी असते , की, ते विचार कलाकार सादर करत असताना प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात . नाटकाच्या मध्या पर्यंत आल्यानंतर मनातील चलबिचल शांत झालेली असते . प्रेक्षक त्यावेळी स्वतः च्या मनातील आवाज ऐकू लागलेला असतो . नवीन विचार आत्मसात करत असतो . नाटकाच्या शेवटच्या भागात तर कलाकारांच्या आणि प्रेक्षकांच्या मनातील प्रश्न नसतात त्यावेळी त्यांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळायला सुरुवात होते हे पहायला मिळते .
प्रेक्षक नाटक पाहतात त्यावेळी त्यांना आलेली अनुभूती ही फारच चैतन्य निर्माण करणारी असते . कोण बोलतो , तुम्ही मला त्या नदीच्या काठावर घेऊन गेलात ,त्या निसर्गामध्ये मी स्वतः असल्याचे मला जाणवले. काही प्रेक्षक तर सांगतात आम्ही सुरुवातीला शांत झोपलेलो . मध्येच जाग येते आणि जाणीव होते हे संवाद माझेच तर नाहीत ना ... आणि नाटकातील प्रवासाबरोबर मी माझा प्रवास करतो . शुद्ध आणि सात्विक शब्द ऐकायला मिळाले .जे काळाच्या ओघात हरवलेले होते . असं किती वेळा आपण आपल्या बरोबर संवाद करणाऱ्या व्यक्तीचे संवाद ऐकत असतो . फक्त ऐकण्याचं नाटक करत असतो . या अनहद नाद नाटकामुळे मला माझा आवाज कधीही कोणत्याही क्षणी ऐकायला येईल तो आता ,आठ दिवसानंतर ,15 दिवसा नंतर , किंवा वर्षा नंतर आयुष्याच्या कोणत्याही क्षणी मला माझा आवाज ऐकण्याची दृष्टी अनहद नाद नाटकाने दिली आहे.
या नाटकामध्ये कलाकार अश्विनी नांदेडकर , सायली पावसकर , कोमल खामकर, योगिनी चौक आणि तुषार म्हस्के आपल्या कलेतून हे नाटक रंगमंचावर सादर करत आहेत.

१२ ऑगस्ट १९९२ पासून “ थियेटर ऑफ रेलेवंस” रंग सिद्धांत जनतेसाठी ‘जन चिंतन मंच ‘ म्हणून उदयास आला आणि १२ ऑगस्ट २०१७ रोजी आपल्या रंग दर्शन यात्रेची २५ वर्षे पूर्ण केली. या २५ वर्षात “थियेटर ऑफ रेलेव्हन्स” नाट्य दर्शनाने , रस्ते, चौक,गावे, आदीवासी पाडे आणि शहरांतून आपली वैश्विक उड्डाण भरून आपली जागतिक स्वीकृती मिळवली आहे.
‘थिएटर ऑफ रेलेवंस’ चे सिद्धांत
१) ‘थिएटर ऑफ रेलेवंस’ हा एक असा रंगमंच आहे, ज्याची सृजनशीलता विश्वाला मानवीय आणि अधिक उत्तम बनवण्यासाठी प्रतिबद्ध असेल.
२) कला ही बाजारीकरणासाठी
नसून समाजा प्रती स्वतःची जबाबदारी स्वीकारेल. लोकांच्या जीवनाचा हिस्सा बनेल.
३) जे मानवी गरजा भागवेल आणि अभिव्यक्तीचे एक माध्यम म्हणून उपलब्ध असेल.
४) जे स्वतःचा , बदलाचे माध्यम म्हणून शोध घेईल. स्वतःचा शोध घेईल आणि रचनात्मक बदलाची प्रक्रिया पुढे नेईल.
५) जे मनोरंजनाच्या सीमा ओलांडून जीवन जगण्याचे माध्यम वा पद्धती बनेल.
( रंग चिंतक –“थिएटर ऑफ़ रेलेवंस” चे निर्माता व प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज यांनी १२ ऑगस्ट ११९२ साली ”थिएटर ऑफ रेलेवंस” चा निर्माण केला आणि तेव्हापासून “थिएटर ऑफ रेलेवंस” नाट्य दर्शनाचा अभ्यास आणि क्रियान्वन भारत आणि जागतिक स्तरावर होत आहे)

आज विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या विनाश काळात,
मानवाचे मानवी असणे हे आव्हान झाले आहे. नाटक “गर्भ”, “अनहद नाद – Unheard Sounds of universe” आणि “न्याय के भंवर में भंवरी” या नाटकांच्या माध्यमातुन आपणांस आपल्या आतील मानवाचा आवाज ऐकवण्यासाठी,मुंबईत १५, १६ आणि १७ नोव्हेंबर २०१७ रोजी तीन दिवसीय ‘नाट्य उत्सव’ साजरा करण्याचे आयोजन केले आहे . आपल्या अर्थपूर्ण आणि सृजनात्मक, रचनात्मक सहभागाची अपेक्षा आहे . कारण “थियेटर ऑफ रेलेवंस” रंग सिद्धांतानुसार ,’प्रेक्षक’ हा पहिला आणि सशक्त रंगकर्मी आहेत.
मंजुल भारद्वाज लिखित व दिग्दर्शित आणि अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के अभिनीत प्रसिद्ध नाटक,“गर्भ” आणि “अनहद नाद –अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिव्हर्स आणि प्रसिद्ध अभिनेत्री बबली रावत अभिनीत नाटक “न्याय के भंवर में भंवरी”नाटकांची प्रस्तुती शिवाजी मंदिर, दादर (पश्चिम) मुंबई येथे अनुक्रमे १५ , १६ आणि १७ नोव्हेंबर २०१७
रोजी सकाळी ११ वाजता होईल.


यावर अधिक वाचा :

प्रेमी जोडप्यांच 'गॅटमॅट' जुळवून देतोय सिनेमाचे टीझर

national news
प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा ...

मी शिवाजी पार्क

national news
आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे डोळसपणे पाहून त्यात नाट्यमयता आणत दिग्दर्शक महेश ...

'राणी मुखर्जीला मी स्टार बनवले'

national news
करण जोहरला फिल्म लाईनमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. करणच्या डायरेक्शनचा पहिला सिनमेा ...

परिणितीची इच्छापूर्ती

national news
सर्वसाधारणपणे असे मानले जाते की इच्छा आणि स्वप्ने नियतीच्या मनात असेल त्याच वेळेस पूर्ण ...

विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा

national news
विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा