शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 डिसेंबर 2016 (08:56 IST)

पाचवा अंकुर फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन

फाळकेंचा जीवनप्रवास अर्थात भारतीय चित्रपटाचा इतिहास आहे - कमल स्वरूप
 
आपल्या देशात आपण ज्या चित्रपट सृष्टीकडे पाहतो तिचा इतिहास जिथे सुरु होतो ते म्हणजे नाशिकचे सुपुत्र दादासाहेब फाळके. त्यांचा पूर्ण जीवनक्रम हा आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास आहे. मात्र दुर्दैवाने त्याची जपवणूक केलेली नाही. हा ऐतिहासिक ठेवा आपण जपला हवा असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक,चित्रपट निर्माते आणि राष्ट्रीय पुरस्कार तसेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते कमल स्वरूप यांनी व्यक्त केले आहे. ते अंकुर फिल्म फेस्टिवल उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
 
अभिव्यक्ती मिडीया फॉर डेव्हलपमेंट आणि मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ५ व्या ‘अंकुर फिल्म फेस्टिव्हल’ आयोजन करण्यात आले आहे. रावसाहेब थोरात सभागृहात कमल स्वरूप यांच्या फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन झाले.
 
उद्घाटनाची अनोखी पद्धत
अगदी जुन्या काळातील चलचित्र फीत फिल्म बॉक्स अर्थात फिल्म बायोस्कोप उघडून करण्यात आले आहे. यातून देखो, सोचो और बनावे असा संदेश देण्यात आला.यावेळी अभिव्यक्तीचे बोर्ड मेंबर अनुराग केंगे आणि भिला ठाकरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
एफ. टी. आय. येथे शिक्षण घेत असतना संशोधन विषय अंतर्गत चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर कमल स्वरूप यांनी फिल्म बनविण्याचे ठरविले होते. सुरुवात अर्थात नाशिक येथे झाली. मात्र आपले दुर्दैव आहे की ज्या मातीत फाळके जन्मले तेथे त्यांच्या विषयी फार तोडकी माहित मिळाली, तर रेव्ह्ररन टिळक यांचे नातू  देवदत्त टिळक यांनी त्यांची माहिती दिली, तर फाळके यांचा वाडा सुद्धा  आता राहिला नाही अशी खंत कमल स्वरूप यांनी व्यक्त केली आहे.
 
कमल स्वरूप यांनी  फाळके फॅक्टरी वेब साईटची निर्मिती आणि दादासाहेब फाळके यांच्या जीवनकार्यावर  तयार केलेल्या ट्रेसिंग फाळके या डॉक्युमेंटरी विषयी त्यांनी महिती दिली आहे.ट्रेसिंग फाळके हा फाळके आणि आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास सांगणार लघुपट आहे. हा मी सशोधन म्हणून तयार केला मात्र हे काम पाहून फिल्म डिविजन ने आहा इतिहास जपवणूक करण्याचे ठरिवले आणि याचा एक शोधपर लघुपट तयार करायला सांगितले  ते आम्ही केले. तर फाळके यांचा जीवन प्रवास कळवा म्हणून मी फाळके फॅक्टरी वेब साईटची निर्मिती  केली आहे अशी माहिती कमल स्वरूप यांनी दिली आहे.
 
फिल्म मेकर्ससाठी कार्यशाळा
गेल्या अंकुर फिल्म फेस्टीवलमध्ये अनेक फिल्ममेकर्स यांनी फिल्म बनविण्याचे मार्गदशन करण्यासाठी अंकुरने मदत करावी असे सुचविले होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन यंदा फेस्टीवलमध्ये दोन सत्रात दोन वेगवेगळ्या विषयावर मान्यवरांच्या मार्गदर्शानाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. पहिली कार्यशाळा अनिल झनकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. ही कार्यशाळा लघु चित्रपट बनवण्याच्या पध्दती (Approaches to Short film making) याविषयावर होणार आहे.