बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (11:42 IST)

अगडबम नाजुकाचे 'अटकमटक' गाणे प्रदर्शित

'अटकमटक' चा डाव प्रत्येकांनी आपल्या लहानपणी खेळला असेल ! धम्माल मस्ती आणि पोटभर हसू आणणाऱ्या या बैठी खेळाचे बोल, आता नव्या रुपात आपल्यासमोर येणार आहे. 'पेन इंडिया लिमिटेड कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत 'माझा अगडबम' या चित्रपटातील 'अटकमटक' हे गाणे प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करणारे आहे. सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच प्रदर्शित करण्यात आलेले हे विनोदी गाणे, 'माझा अगडबम' सिनेमातील 'नाजूका' या प्रमुख पात्रावर आधारित आहे. प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पडणाऱ्या या धम्माल गाण्याला आनंद शिंदे यांचा दमदार आवाज लाभला आहे. मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या 'अटकमटक' गाण्याला, टी. सतीश चक्रवर्ती यांनी संगीत दिले आहे. नाजुकाच्या विविध करामती दाखवणारे हे गाणे पाहणाऱ्यांना मनोरंजनाची नवी 'चटक' लावून जाते. येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या या सिनेमात तृप्ती भोईर आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका आहे. शिवाय, सुपरहिट 'अगडबम' चा दमदार सिक्वेल असलेल्या या 'माझा अगडबम'चे दिग्दर्शन आणि लेखन तृप्ती भोईरनेच केले असून, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांसोबत तिने निर्मितीफळीतदेखील आपला सहभाग दर्शवला आहे. शिवाय, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.