शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (14:08 IST)

अविश- अनेक कलांचा संगम एका छपराखाली

प्रसिद्ध संगीतकार विश्वजीत जोशी यांच्या अविश आर्ट हबचे उद्धाटन प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्याच्या स्पर्धेच्या जगात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अविश आर्ट हब हा उत्तम पर्याय आता पुणेकरांसाठी निर्माण झाला आहे. पुण्याचे हार्ट ऑफ द सिटी मानल्या गेलेल्या फर्ग्युसन रोडवर ‘अविश पर्फोरमिंग आर्टस एण्ड लाईफस्टाईल हब’ सुरु झाले आहे. विविध कलांचा प्रसार आणि व्यक्तिमत्त्व विकास हा अकादमीचा मूऴ उद्देश आहे. 
 
या वेळी बोलताना विश्वजीत जोशी यांनी सांगितले की प्रत्येकामध्ये एखादी कला दडलेली असते. मात्र रोजच्या रुटीनमध्ये आपण स्वत:ला विसरुन जातो. या कलांना पुन्हा पुनरुज्जीवन देण्याच्या उद्देशाने अविश आर्ट हब सुरु करण्यात आली आहे. कलेला वयाचं बंधन नसतं. त्यामुळे कुठल्याही वयोगटातील व्यक्ती अविश आर्ट हबमध्ये कलांचा आस्वाद घेऊ शकते, असं अविशचे सर्वेसर्वा संदीप बिरादार यांनी सांगितलं. गायिका बेला शेंडे यांनी सांगितलं की सर्व कला एकाच छपराखाली सुरू करणारी  अविश ही पुण्यातील अनोखी संस्था आहे. प्रत्येक कलेतल्या दिग्गजांचं मार्गदर्शन इथल्या विद्यार्थ्यांना लाभणार असल्यामुळे अविश अकादमीतर्फे अनेक कलांचा प्रसार होणार असल्याचं बेला शेंडे यांनी नमूद केलं. अनेक कलांचा हा आर्टिस्ट हब नक्कीच नवीन कलाकार घडवेल असा विश्वास बेला शेंडे यांनी व्यक्त केला. अविश आर्ट हब ही अनोखी संस्था असून यात तुम्हाला प्रत्येक कलेविषयीचे ज्ञान मिळू शकणार आहे. नृत्य, शास्त्रीय नृत्य, पाश्चात्य नृत्य तसेच झुंबासारख्या फिटनेस नृत्य प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर संगीतातल्या विविध बाजूंविषयीचे ज्ञान इथे मिळणार आहे अविश आर्ट हबचे वैशिष्ट्य म्हणजे दिवसभराचा ताण तणाव कमी करण्यासाठी स्ट्रेस बस्टर म्हणून विविध सेशन्स इथे सुरु करण्यात येणार आहे. यात मेडिटेशन, रेकी, म्युझिक थेरपी, देखील शिकवली जाणार आहे. या वेळी निर्माता मोहन दामले, दिल दोस्ती दुनियादरी फेमस आशू म्हणजे पुष्कराज चिरपुटकर, अभिनेता सौरव गोगटे, आदि कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी यांनी केले. 
 
विश्वजीत जोशी यांच्याविषयी – कधी तू, ओल्या सांजवेळी अशा अनेक गाण्यातून आपल्या समोर आलेली अविनाश विश्वजीत जोडीमधील विश्वजीत जोशी आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. मंत्र या चित्रपटाद्वारे ते आता निर्माता म्हणून आपल्या भेटीला येत आहेत. गेली 16 वर्षे संगीत आणि कला जगतात 55 पेक्षा जास्त चित्रपटांतून संगीतकार म्हणून त्यांनी स्व:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. पुण्यासारख्या कलेशी नाळ जोडलेल्या शहरात कलेच्या विकासासाठी अकादमी सुरु करण्याचा त्यांचा मानस अविश आर्ट हबतर्फे पूर्णत्वास येत आहे. 
अधिक माहितीसाठी संपर्क - तृप्ती पारसनीस- 9833581326