testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

१ मार्चला प्रेक्षकांना लागणार 'डोक्याला शॉट'

Dokyala Shot
Last Modified गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (14:13 IST)
रितेश देशमुख आणि कैलास खेर यांच्या हस्ते ट्रेलर आणि म्युझिक लाँच.
अनेक दिवसांपासून सगळयांना प्रतीक्षा असणाऱ्या 'डोक्याला शॉट' या हटके नाव असलेल्या चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. मुंबईत संपन्न झालेल्या या सोहळ्यात रितेश देशमुख यांच्यासह कैलाश खेर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात ट्रेलर सोबत 'डोक्याला शॉट' चित्रपटाच्या संगीताचेही कैलास खेर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
Dokyala Shot
नावाप्रमाणे अगदी हटके घटना चार मित्रांच्या आयुष्यात घडते आणि चालू होतो 'डोक्याला शॉट'. सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित या चार जीवलग मित्रांच्या एका धमाल गोंधळाची गोष्ट असलेला' डोक्याला शॉट' हा चित्रपट मनोरंजनाने परिपूर्ण असे एक 'पॅकेज' असणार आहे. अभिजीत (सुव्रत जोशी) आणि सुब्बलक्ष्मी (प्राजक्ता माळी) हे एकमेकांच्या प्रेमात असतात. त्यांचे लग्न ज्या दिवशी होणार असते त्याच्या आदल्या दिवशीच एक घटना घडते, आणि त्यातून संपूर्ण चित्रपटाला कलाटणी मिळते. अभिजीत आणि त्याचे मित्र यांची या घटनेतून जी काही तारांबळ उडते आणि त्यातून सावरताना जी धमाल होते ती म्हणजे 'डोक्याला शॉट'. एकमेकांना या गोष्टीत सांभाळून घेताना त्या सर्व मित्रांची होणारी तारेवरची कसरत आणि त्यातून घडणारे विनोद यांचे अगदी धमाल मजेदार चित्रण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक गणेश पंडित हे या चित्रपटाद्वारे त्यांचे अभिनयाचे कौशल्य दाखवणार आहे.
Dokyala Shot
या चित्रपटाबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाले की," मी हा चित्रपट पहिला आणि पाहताना माझे फक्त खुर्चीतून खाली पडायचे बाकी होते. इतका मी हसत होतो. खूप सुंदर चित्रपट आहे. आणि मैत्रीवर आधारित आहे. आपण आयुष्यात एकच गोष्ट खरी कमावतो आणि ती म्हणजे 'मैत्री'. आपली खरी मैत्री आपल्यासोबत शेवटपर्यंत असते. त्यामुळे अशा या वेगळ्या तरीही जिव्हाळ्याच्या विषयावर असलेला हा सिनेमा तुम्ही नक्की बघा. मी शाश्वती देतो, की तुमची चित्रपटगृहातून बाहेर पडताना नक्कीच निराशा होणार नाही."
कैलास खेर हे देखील या सोहळयाला आवर्जून हजर होते. कैलाशजींनी या चित्रपटात एक गाणे देखील गायले आहे. त्या अनुभवाबद्दल ते म्हणाले, "मला तर 'डोक्याला शॉट' या शब्दाचा सुरुवातीला अर्थही माहित नव्हता तरी मी या सिनेमात गाणं गाण्यास होकार दिला, कारण या चित्रपटाची कथा मला आवडली, त्यानिमित्ताने मला पुन्हा मराठीत काम करण्याची संधी मिळत होती आणि ही संधी मला गमवायची नसल्याने मी होकार दिला".

'डोक्याला शॉट' या चित्रपटाची निर्मिती उत्तुंग ठाकूर यांनी केली आहे. उत्तुंग ठाकूर यांनी या आधी 'बालक पालक', 'येल्लो' यांसारख्या अप्रतिम कलाकृतींची निर्मिती केली आहे. कमी वयात उत्तम कथेची जाण असलेल्या, नेहमी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या उत्तुंग ठाकूर यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीला एक उत्तम दिग्दर्शक लाभणार आहे. 'न्यूड', 'बालक पालक', 'रेगे', 'येल्लो' अशा विविध विषयांवर आधारित अप्रतिम चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर शिवकुमार पार्थसारथी हे 'डोक्याला शॉट' चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे. याशिवाय गुरु ठाकूर आणि चेतन सैंदाणे यांनी या चित्रपटातील गाणी लिहली आहे. त्यांच्या सुंदर शब्दांना अमितराज, श्रीकांत-अनिता यांनी संगीतबद्ध केले आहे. तर मिका सिंग, कैलास खेर या दिगज्ज गायकांनी त्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला रोहन-विनायक यांनी पार्श्वसंगीत दिले आहे तर सुमन साहू यांनी या सिनेमाचे छायाचित्रण केले आहे. या लाँच सोहळ्यासाठी 'डोक्याला शॉट' चित्रपटाचे निर्माता उत्तुंग ठाकूर, दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी यांच्यासह राधिका क्षीरसागर, समीर पाटील, दिग्दर्शक अभिजित पानसे, संगीतकार अमितराज आणि या चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

मराठी मुलीच्या गालावर हात फिरवल्यास...

national news
तरुण मुलीच्या गालावरुन गुलाबाचे फुल फिरवल्यास... इंग्रजी मुलगी: यु आर नॉटी ...

आला रे आला चांदणं रातीला शिमगा आला ...

national news
होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत कोकणात शिमगा साजरा केला जातो आणि हा सण साजरा करण्यासाठी ...

पाकिस्तानी गायकांची गाणी युट्यूब चॅनेलवरून हटवली

national news
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर टी- सीरिजनं पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान ...

पुलवामा शहिदांच्या सन्मानार्थ अजय देवगणचा मोठा निर्णय, ...

national news
14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात ...

अमिताभ बच्चन लवकरच आणत आहे 'कौन बनेगा करोड़पति' सीझन 11

national news
टीव्हीचे सर्वात लोकप्रिय शो कौन बनेगा करोड़पति लवकरच आपल्या 11व्या सीझन बरोबर परत येणार ...