शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑक्टोबर 2018 (12:42 IST)

दुष्काळाचे वास्तव दर्शन घडवणारा 'एक होतं पाणी' सिनेमा

सध्या मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक विषयांना हात घातला जातो आहे. अशाच एका सामाजिक विषयाला हात घालणारा 'एक होतं पाणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे असा संदेश या सिनेमातून देण्यात येणार आहे. 'न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज' या निर्मिती संस्थेअंतर्गत निर्मिती होणाऱ्या या सिनेमातील एका गाण्याचे रेकॉर्डिंग नुकतेच पार पडले. कैलास स्टुडिओ येथे पार पडलेल्या या रेकॉर्डिंगला सिनेमाचे दिग्दर्शक रोहन सातघरे, संगीतदिग्दर्शक विकास जोशी यांची उपस्थिती होती. रोहित राऊत, हृषीकेश रानडे तसेच आनंदी जोशी यांच्या आवाजातील गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले. विजय तिवारी व डॉ. प्रविण भुजबळ हे सिनेमाचे निर्माते आहेत. आशिष निनगुरकर लिखित या सिनेमाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केले आहेत.

हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांच्या भूमिका या सिनेमात आहेत.