बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (15:26 IST)

रात्रीस खेळ चाले 3 पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

झी मराठीची लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले 3 ने प्रेक्षकांना बांधून ठेवले आहे. कोरोनामुळे या मालिकेचे चित्रीकरण बंद करण्यात आले होते.मात्र आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे. लवकरच ही मालिका आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुढच्या आठवड्यापासून 16 ऑगस्ट पासून ही मालिका एसोमवार ते शनिवार आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला रात्री 11 वाजता येणार आहे.
 
या पूर्वी या मालिकेच्या भाग 1 आणि भाग 2 याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मालिकेचा तिसरा भाग सुरु झाल्यावर कोरोनामुळे त्याच्या चित्रीकरणावर ब्रेक लागला.त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका पुन्हा सुरु होणार की कायमची बंद होणार असा प्रश्न पडला.
 
परंतु नुकताच मालिकेचा नवा प्रोमो शेयर करत वाहिनीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.एवढेच नव्हे तर आता शेवंता घायाळ नाही तर जीवच घेणार.असे देखील म्हटले आहे. या मालिकेचा प्रोमो 'तिला पाहून फक्त काळजाचा ठोका चुकणार नाही तर थांबेल कायमचा...येतेय 'शेवंता'..असे कॅप्शन देखील देण्यात आले आहे.
 
अण्णा नाईक,शेवंता,माई,पांडू,कावेरी,यांची वाट प्रेक्षक आतुरतेने बघत आहे.त्या मुळे आता कलाकारांसह लेखक, निर्माते आणि दिग्दर्शकही जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.