गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (13:28 IST)

हृता दुर्गुळेची रोमँटिक पोस्ट व्हायरल

अलीकडेच सर्वांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि तिचा प्रियकर प्रतीक शाह यांचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला. आता हृताने साखरपुड्यानंतर आपली पहिली रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
 
छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून हृता घराघरात पोहोचलेली आहे. साखरपुडा झाल्यानंतर दोन दिवसांनी प्रतीक शाहाचा वाढदिवस होता आणि या निमित्ताने हृताने खास पोस्ट शेअर केली ज्यात तिने प्रतीकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
हृताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये हृता म्हणाली, “वाढदिवसाच्या शुभेच्छा मिस्टर शाह…, तुला खूप प्रेम, आनंद, भाग्य आणि सकारात्मकता. तू जिथं जाशील त्या ठिकाणी तुझ्या चेहऱ्यावरील तेज असेच राहावे. तुझ्या चेहऱ्यावरचे हसू नेहमी असेच राहावे. फक्त आणि फक्त तुझ्यासाठी प्रेम,” असे तिने यात म्हटले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta (@hruta12)

साखरपुड्यानंतर तिची ही पहिली पोस्ट असून यावर अनेकांचे लाईक्स आणि कमेंट आल्या आहेत.