1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2019 (09:41 IST)

मराठी बिग बॉस : महेश मांजरेकर घेवून येत आहेत रॅप सॉंग

mahesh manjarekar
अभिनेता रणवीर सिंगने गली बॉयच्या चित्रपटाच्या माध्यमातून धम्माकेदार रॅप सादर करत ते फार लोकप्रिय केले. आता अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत एक अफलाटतून रॅप सॉंग. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनसाठी महेश मांजरेकर यांनी नुकतच एक अतिशय हटके असे रॅप सॉंग शूट केले असून विशेष म्हणजे त्याने ते स्वतः गायले आहे. महेश मांजरेकरांचा डॅपर लुक, विंटेज बीटल रेट्रो गाडीवर बसून त्यांची या रॅप सॉंगमधली एन्ट्री एकदम कडक झाली आहे. कार्यक्रमाचे अनेक प्रोमोज महेश मांजरेकरांनी शूट केले आहेत. प्रत्येक प्रोमोमध्ये त्यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत असून, मांजरेकरांच्या या वेगवेगळ्या लुक्समुळे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणते सेलेब्रिटी जाणार याबद्दल प्रेक्षकांनी बरेच तर्क देखील लावण्यास सुरुवात केली आहे. महेश मांजरेकर या गाण्यामध्ये चार वेगवेगळ्या डॅपर लुक्समध्ये दिसणार आहेत. या गाण्याच्या चित्रिकरणासाठी सहा वेगळ्या प्रकारचे सेट तयार करण्यात आले आहेत. या गाण्याची झलक बघण्यासाठी कलर्स मराठी आपल्या रसिकांना बघावा लागणार आहे.