बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (18:12 IST)

'माझी तुझी रेशीमगाठ’या मालिकेत हा कलाकार घेणार तूर्त ब्रेक; जाणार लाँग टूरवर

majhi tujhi resham gath
सध्या टीव्ही वरील अनेक वाहिन्यांवर वेगवेगळ्या मालिका गाजत आहेत, परंतु त्यात काही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. त्यापैकीच एक म्हणजे झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ही मालिका होय. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर, आनंद काळे या कलाकारांमुळे मालिकेला लोकप्रियता लाभत आहे. मात्र या मालिकेतील एक कलाकार हा काही दिवस या मालिकेतून ब्रेक घेणार आहे. या मालिकेत विश्वजित चौधरी हे पात्र आनंद काळे यांनी साकारले आहे. या पात्रामुळे घराघरात त्यांना ओळख मिळाली आहे. मात्र पुढील काही दिवस ते या मालिकेतून ब्रेक घेणार आहेत.
 
आनंद काळे हे बाईकवरुन ‘कोल्हापूर ते कश्मीर लेह लडाख’अशी सफर करणार आहेत. त्यामुळेच त्यांनी या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. काही दिवसांपूर्वी यांनी हा प्लॅन बनवला होता. त्या प्लॅननुसार आता आनंद काळे 21 दिवस 7000 किलोमीटरचा प्रवास करून लेह लडाखची बाइक राइड करणार आहेत.
 
आनंद काळे हे गेल्या ३० वर्षापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. नाटक व मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत आनंद काळे यांनी साकारलेली कोंडाजीबाबा फर्जंद ही भूमिका खूप गाजली. सौदामिनी ताराराणी मालिकेतील हंबीरराव मोहिते यांच्या रूपातही आनंद यांनी पसंती मिळवली आहे.
 
काही वर्षांपूर्वीच Kawasaki Ninja 1000 ही गाडी काळे यांनी खरेदी केली होती. पण पुढील 21 दिवस 7000किलोमीटरचा प्रवास करुन ते आपले स्वप्न पूर्ण करताना दिसणार आहेत. यामुळे त्यांनी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. त्यांनी याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ‘ माझ्या बकेट लिस्टमधील आणखी एक कामासाठी मी निघत आहे. कोल्हापूर ते काश्मीर-लेह लद्दाख , अंदाजे 7000किमी. तुमच्या सर्वांना खूप खूप प्रेम. निरोगी राहा आणि सुरक्षित रहा. तसेच मला पुढील 21 दिवसांसाठी मिस करा. ‘असे काळे यांनी यात म्हटले आहे.