1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 13 जुलै 2022 (16:43 IST)

'मन उडू उडू झालं ' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार ?

'Man Udu Udu Zhala
अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता अजिंक्य राऊत यांची प्रेमकथा असलेली मालिका मन उडू उडू झालंने  ही प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. या मालिकेत दिपू आणि इंद्रा इंद्रजित साळगावकर म्हणजेच इंद्रा आणि दिपिका देशपांडे म्हणजेच दीपू यांच्यात फुलणारं प्रेम, घयांनी प्रेक्षकांची मने जिंकली असून या मालिकेचे प्रसारण झी मराठी वर सांयकाळी साडे सात वाजता होत आहे. ही मालिका गेल्या जुलै पासून सुरु झाली होती. प्रेक्षकांनी या मालिकेला प्रेम दिले पण आता या मालिकेची टीआरपी रेटिंग कमी झाली आहे. त्या मुळे ही मालिका बंद होणार का अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता मात्र एका नव्या मालिकेचं प्रोमो प्रसारित करण्यात आले असून त्या मालिकाची वेळ संध्याकाळी साडे सात म्हणजे मन उडू उडू झालं या मालिकेच्या वेळेवर होणार आहे. त्यामुळे आता मन उडू उडू झालं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते की त्याची वेळ बदलण्यात येणार आहे हे समजू शकलं नाही.