testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भिकारी सिनेमातील 'मागू कसा मी' गाण्याचे बनले प्रॅक्टीस सॉंग

bhikari
Last Modified बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (10:29 IST)
मी मराठा फिल्म प्रॉडक्शनचे
शरद देवराम शेलार आणि गणेश
आचार्य निर्मित तसेच
जीसिम्सचे कार्तिक निशानदार व अर्जुन बरन प्रस्तूत
'भिकारी' सिनेमातील 'मागू कसा मी' हे गाणे सध्या खूप गाजत आहे.
निस्सीम मातृप्रेमाचे प्रतिक असलेलं हे गाणं, थेट काळजाचा वेध घेत आहे. गुरु ठाकूर लिखित आणि विशाल मिश्रा संगीत दिग्दर्शित या गाण्याला अजय गोगावले यांचा
आवाज लाभला आहे. या गाण्याची वाढतीप्रसिद्धी लक्षात घेता, नांदेडच्या काही युवकांना त्यावर प्रॅक्टीस सॉंग बनवण्याचा मोह आवरला नाही. आईसाठी सर्वकाही सोडून, रस्त्यावर 'भिकारी' च्या वेशात वणवण फिरणारा मातृभक्त मुलगा यात दिसून येतो. स्वप्नील जोशीवर चित्रित करण्यात आलेल्या या हृदयस्पर्शी गाण्याला, नांदेडच्या कपिल रमेश जोंधळ या युवकाने चांगलाच न्याय दिला आहे.

ह्या गाण्यातील भावना जपत कपिल जोंधळ यांनी त्यावर एक प्रॅक्टीस सॉंग दिग्दर्शित केले आहे. यात मुख्य कलाकार महेंद्र मीनाक्षी गायकवाड असून, आपल्या आईसाठी हे गाणे चित्रित केले असल्याचे तो सांगतो. विशेष म्हणजे सोशल साईटवर प्रसारित झालेले हेप्रॅक्टीस सॉंग फेसबुकवरील बिईंग मराठी या पेजवर टाकण्यात आले असून, आतापर्यत दोन लाखांहून अधिक लोकांनी ते पाहिले आहे.

गणेश आचार्य दिग्दर्शित 'स्वामी तिन्ही जगाचा...भिकारी
ह्या सिनेमात आई आणि मुलाच्या भावनिक नात्याची नाजूक गुंफण आपल्याला पाहायला मिळणार आहेत.. 'मागू कसा' हे गाणे प्रत्येकांना आपल्या आईची आठवण करून देईल.
>
येत्या ४ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाची
कथा शशी यांची असून पटकथा, संवाद गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. यात स्वप्नील जोशीची मध्यवर्ती भूमिका असून, ऋचा
इनामदार, कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर,
सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा ह्या कलाकारांची देखील विशेष भूमिका असणार आहे.


यावर अधिक वाचा :

'रेस ३' सोशल मीडियावर लीक

national news
रेस ३ हा चित्रपट सोशल मीडियावर लीक झाला आहे. मल्टीस्टारर अॅक्शनपट असणाऱ्या रेस ३ चं ...

माझ्या सख्या.....

national news
अशा कशा माझ्या सख्या... कुणालाही न कळतील अशा. कुणी खूप बोलघेवडी सुसाट बोलत सुटते वेडी

‘फर्जद’ने बॉक्स ऑफिसचा गड राखला

national news
१ जूनला प्रदर्शित झाला झालेल्या ‘फर्जंद’चित्रपटा होऊन तीन आठवडे उलटले तरी या चित्रपटाची ...

मराठी बिग बॉसचे घर प्रेक्षकांच्या भेटीला

national news
बिग बॉसचे मराठमोळं घर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आपणही बिग बॉसच्या घरात जावे अशी ...

काय मत आहे तुमचं...???

national news
बिग बाजार / D mart मध्ये बायकोच्या मागे निरर्थक हिंडतांना अनेक केविलवाणे नवरे मी ...