testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

marathi movie
Last Modified शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018 (08:11 IST)
झी मराठी वरील "लगीर झालं जी "या लोकप्रिय मालिकेचे पार्श्वगीत, "ये रे ये रे पावसा" चित्रपटाचे टायटल साँग, लव्ह लफडे चित्रपटातील 'ताईच्या लग्नाला' यासारखी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे गायक आणि संगीतकार प्रवीण कुवर यांचे अजून एक नवे चित्रपट गीत लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. पण या चित्रपटाचे नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. दुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि निलेश पाटील (शेलिनो ड्रीम्स इन्फोटेन्मेंट) निर्मित "फुगडी" या गायक प्रवीण कुवर यांच्या आवाजातील गाण्याचे रेकॉर्डींग नुकतेच युफोनी स्टुडिओ, अंधेरी पश्चिम येथे पार पडले. निलेश पाटील यांची ही पहिलीच निर्मिती असून लवकरच या गाण्याच्या चित्रीकरणालाही सुरुवात होणार आहे.
"फुगडी..." या गाण्याची रचना हि नवोदित गीतकार रमझान पठाण यांची असून दिग्दर्शन सुकेश सावर्डेकर यांनी केलं आहे. या गाण्यावर अभिनेता चेतन कुमावत थिरकणार असून चेतनने याआधी बरीच व्यावसायिक नाटकं, लोकमान्य एक युगपुरुष हा चित्रपट, तसेच कलर्स मराठी वरील कुंकू टिकली टॅटू या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील त्याने साकारलेला खलनायक विशेष गाजला. त्यामुळे आता या गाण्यात तो काय धम्माल करणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.
दुर्वा एंटरटेन्मेंट प्रस्तुत फुगडी हे एक मराठी सोबतच हिंदी टच असलेलं भन्नाट गाणं लवकरच चेतन कुमावतच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हिंदी टच व्यतिरिक्त इतर अनेक गमती जमती या गाण्यात पाहायला मिळणार आहेत. सुकेश सवर्डेकर यांनी याआधी मराठी चित्रपट विठ्ठला शप्पथची निर्मित केला आहे. आज पार पडलेल्या या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी गायक प्रवीण कुवर यांच्यासह दिग्दर्शक सुकेश सावर्डेकर आदी उपस्थित होते.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

मराठी स्टार्सनी स्वीकारले इन्स्टा चँलेंज

national news
अल्पावधीतच लाखो लोकांपर्यंत पोहोचणा-या सोशल नेटवर्किंग साइटवर एखादी नवीन गोष्ट आली, की ...

भूमी ग्लॅमरस रूपात!

national news
हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ज्या र्‍हाटोळ्या तारका चकत आहेत त्याध्ये राधिका आपटे आणि भूमी ...

"नावझुद्दीन सिद्दीकी ची निवड मी दोन मिनिटांत केली." - संजय ...

national news
शिवसेना सुप्रीमो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' ...

'नशीबवानचा' कृतज्ञता सोहळा

national news
'लॅन्डमार्क फिल्म्सतर्फे' सफाई कर्मचारी आणि त्यांच्या परिवारासाठी 'नशीबवान' या चित्रपटाचा ...

तू मला आवडतेस, हे Personal आहे...

national news
तू मला आवडतेस, हे Personal आहे आणि तुझी मैत्रीण पण मला आवडते हे Secret आहे. आणि तुझ्या ...