शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (16:08 IST)

संविधान दिनानिमित्त रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित ‘राजगती’ हे मराठी नाटक 25 नोव्हेंबर रोजी पुण्यात प्रस्तुत होणार आहे.

rajgati
तो देश मोठ्या संकटात सापडतो, ज्याची जनता राजकारणाला घाणेरडे समजते आणि संविधानाधारे निवडून आलेली सत्ता संविधानाचा पायाच उध्वस्त करत आहे.
 
आज भारतात तीच परिस्थिती आहे! भांडवलशाही शक्तींनी निवडणुकीला खरेदी विक्रीचा धंदा बनवला. निवडणुकां हा भांडवलाचा इतका भयंकर आणि कुरूप खेळ झाला आहे की, 'निवडणुका या लोकशाहीच्या पर्व राहिल्या नाही'! निवडणुका या आता मतं विकत घेऊन आणि विकलेल्या लोकप्रतिनिधींना 'भांडवलदारांचे' सरकार बनवण्यासाठीचा धंदा झाला आहे !
 
जनतेचे, जनतेसाठी, जनतेद्वारा असणारी सरकार आता 'भांडवलदारांचे' 'भांडवलदारांसाठी' भांडवलदारांद्वारे असे सरकार झाले आहे. धर्माच्या नावावर जनता झुंड झाली आहे ! खासदार-आमदारांची खरेदी-विक्री होत आहे ! 80 कोटी लोकं 5 किलो मोफत धान्यांच्या भरवशावर दाण्या दाण्याला तरसत आहेत.
 
पण या परिस्थितीला जबाबदार कोण? होय, या विदारक परिस्थितीला जनताच जबाबदार आहे! संविधानाने 'आम्ही भारताचे लोक' म्हणजेच भारताच्या मालक असण्याचा अधिकार दिला, पण हे मालक असण्याचे कर्तव्य आपण पार पाडले नाही.
rajgati
धर्मांध होऊन मतदान केले. सत्तेत असलेल्यांना प्रश्न विचारणे बंद केले! खोट्याचे समर्थन केले. लबाडाला सत्तेच्या शिखरावर बसवून स्वतःला देशद्रोही असण्याची उपाधी दिली.
 
आपले संविधान हाच आपला प्राण आहे. भारताच्या विविधतेचा विधाता आहे. वर्णव्यवस्थेच्या युगानयुगे  चालणाऱ्या भेदभावाला आव्हान दिले आणि प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिला. परंतु वर्णवादी मानवताविरोधी, वर्चस्ववादी आणि आत्महीन प्रवृत्तींना आज धर्माच्या नावाखाली संविधानातील पवित्र तत्व 'सेक्युलॅरिझम'चा गळा घोटून बहुसंख्याक धर्म असलेले जातिआधारित राष्ट्र निर्माण करायचे आहे.
 
संविधान संमत भारतासाठी राजनैतिक परिदृश्य बदलूया! राजकारणातील घाणीला साफ करून देशाला भांडवलदार, आणि धर्मांधं वर्णवादींच्या तावडीतून मुक्त करूया.
 
लक्षात ठेवा, निसर्गानंतर ' राजनीती ' हे मानव कल्याणाचे पवित्र निती आहे! तुमचा राजकारणाशी काही संबंध नाही हा भ्रम मोडा! तुम्ही या देशाचे मालक आहात आणि राजकारणी तुमचे सेवक आहेत हे सत्य स्वीकारा!
चला भ्रम मोडू या, राजगतीचे मंथन करून राजनितीचे सत्य आत्मसात करूया आणि धर्मनिरपेक्ष, समतावादी, लोकशाही भारताची निर्मिती करूया!
 
थिएटर ऑफ रेलेवंस शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता पुण्यात घेऊन येत आहोत, राजगती हे मराठी नाटक.
पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह औंध येथे शनिवार 25 नोव्हेंबर 2023 दुपारी 12.30 वाजता.
 
नाटक : राजगती (मराठी)
लेखक - दिग्दर्शक : मंजुल भारद्वाज
अनुवाद : विवेक खरे
अनुवाद सहायक : अश्विनी आणि सायली
कुठे :पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह औंध,पुणे
 
केव्हा : शनिवार 25 नोव्हेंबर 2023 दुपारी 12.30 वाजता.
 
रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित नाटक
'राजगति' समता,सत्य,न्याय,अहिंसा आणि संवैधानिक व्यवस्थेच्या निर्माणासाठी ‘राजनैतिक परिदृश्याला' बदलण्याची चेतना जागवते. ज्याने आत्महीनतेचा भाव उध्वस्त होऊन ‘आत्मबळा' ने प्रेरित ‘राजनैतिक नेतृत्वा' चा निर्माण व्हावा .
 
कलाकार: अश्विनी नांदेड़कर, सायली पावस्कर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, नृपाली जोशी, तनिष्का लोंढे, प्रांजल गुडीले, ऋतुजा चंदनकर आणि इतर कलावंत!