testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

29 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचा निकाल

puraskar
Last Modified सोमवार, 8 मे 2017 (20:55 IST)
29 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत जिगिषा आणि अष्टविनायक, मुंबई या संस्थेच्या मग्न तळ्याकाठी या नाटकासाठी रुपये 7 लाख 50 हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.

रसिका प्रॉडक्शन्सच्या अनामिका संस्थेच्या कोड मंत्र या नाटकास रु. 4 लाख 50 हजाराचे द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. तसेच सुबक, मुंबई या संस्थेच्या अमर फोटो स्टुडिओ या नाटकास रु. 3 लाखांचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. या पुरस्कारांनी दिग्दर्शकांनाही सन्मानित करण्यात आलं आहे. मग्न तळ्याकाठी या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी चंद्रकांत कुलकर्णी यांना (रु.1,50,000/-) प्रथम पारितोषिक देण्यात आलं आहे. तर कोडमंत्र या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी

राजेश जोशी यांना (रु.1,00,000/-) द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. तर
अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनाही (रु.50,000/-) रोख पुरस्कार प्राप्त झाला आहे. मनस्विनी लता रविंद्र यांनी लेखन केलेल्या अमर फोटो स्टुडिओ या नाटकाला (रु.1,00,000/-) प्रथम पारितोषिक मिळालं आहे. तर मग्न तळ्यासाठी या नाटकाच्या लेखनासाठी महेश एलकुंचवार यांना (रु.60,000/-) द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. तसेच विजय निकम लिखित कोडमंत्र या नाटकाला (रु.40,000/-) तृतीय पारितोषिक मिळालं आहे. 2 ते 6 मे 2017 या कालावधीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 10 व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आशालता वाबगांवकर, श्रीनिवास भणगे, चंद्रकांत मेहेंदळे,
अजित सातभाई आणि सुनील देवळेकर यांनी काम पाहिले.

इतर पुरस्कार
प्रकाश योजना: प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) रवि रसिक (नाटक-मग्न तळयाकाठी), द्वितीय पारितोषिक(रु.30,000/-) भोतेश व्यास, (नाटक-कोडमंत्र), तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) योगेश केळकर (नाटक-किमयागार)
नेपथ्य: प्रथम पारितोषिक (रु.40,000/-)प्रसाद वालावलकर (नाटक-कोड मंत्र), द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) प्रदिप मुळये(नाटक-मग्न तळयाकाठी), तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) प्रदिप मुळये (नाटक-अमरफोटो स्टुडिओ)
संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक(रु.40,000/-) आनंद मोडक व राहुल रानडे(नाटक-मग्न तळयाकाठी) द्वितीय पारितोषिक(रु.30,000/-) सचिन जिगर (नाटक-कोडमंत्र) तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) राहुलरानडे (नाटक-बंध-मुक्त)
वेशभूषा : प्रथम पारितोषिक (रु.40,000/-)प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव (नाटक-मग्नतळयाकाठी) द्वितीय पारितोषिक(रु.30,000/-) कल्याणी कुलकर्णी-गुगले(नाटक-अमर फोटो स्टुडिओ) तृतीयपारितोषिक (रु.20,000/-) अजय खत्री(नाटक-कोड मंत्र)
रंगभूषा : प्रथम पारितोषिक (रु.40,000/-)अभय मोहिते (नाटक-अमर फोटो स्टुडिओ)द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) शरदसावंत (नाटक-मग्न तळयाकाठी)
तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) संतोषपेडणेकर व हेमंत कदम (नाटक-कोड मंत्र)
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.50,000/-
पुरुष कलाकार : चिन्मय मांडलेकर (नाटक-मग्न तळयाकाठी), अमेय वाघ (नाटक-अमरफोटो स्टुडिओ), वैभव मांगले (नाटक-मग्नतळयाकाठी), सुव्रत जोशी (नाटक-अमर फोटो स्टुडिओ), प्रशांत दामले (नाटक-साखर खाल्लेला माणूस)
स्त्री कलाकार : मुक्ता बर्वे (नाटक-कोड मंत्र),निवेदिता सराफ (नाटक-मग्न तळयाकाठी),लिना भागवत (नाटक-के दिल अभी भरानही), हेमांगी कवी (नाटक-ती फुलराणी), इलाभाटे (नाटक-यू टर्न-2)


यावर अधिक वाचा :

तर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन

national news
बॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...

आंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी

national news
आंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )

श्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत

national news
परफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...

"अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न"

national news
"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...

मिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध

national news
गेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...