रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 डिसेंबर 2018 (09:03 IST)

बाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा

शिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपट येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत ‘ठाकरे’ या चित्रपटाची निर्मिती करत असून सध्या त्याच्या डबिंगचं काम सुरू आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने मराठीतील बाळासाहेबांच्या आवाजासाठी एका मोठ्या कलाकाराची निवड करण्यात आली आहे.या बायोपिकमध्ये बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. हिंदीतल्या चित्रपटासाठी त्याचाच आवाज असणार आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार मराठीतील चित्रपटात बाळासाहेबांना अभिनेते सचिन खेडेकर आवाज देणार आहेत. सचिन खेडेकरांनी नुकतंच त्यांचं डबिंग पूर्ण केलं आहे. त्यामुळे चित्रपट फार उत्तम होईल असे चित्र आहे.अभिजीत पानसे चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. २३ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.तर इतक्या कमी वेळेत बाळासाहेब दाखवणे शक्य नाही त्यामुळे त्याचा सिक्ववल सुद्धा येणार आहे.