1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 27 ऑक्टोबर 2016 (10:47 IST)

'युनिव्हर्सल मराठी’ च्या माध्यमातून लघुपटकारांसाठी हक्काचं व्यासपीठ

लघुपट चळवळीतून सृजनशील नवोदितांना संधी देणा-या 'युनिव्हर्सल मराठी' ने ‘माय मुंबई’ लघुपट महोत्सवाचे  केले आहे. महोत्सवाचे हे पाचवे वर्ष आहे. यंदा हा महोत्सव डिसेंबर महिन्यात रवींद्र नाट्य मंदिरच्या मिनी थियटर मध्ये पार पडणार आहे. तीन दिवसीय असलेल्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लघुपटांचे स्क्रीनिंग, मान्यवरांचे चर्चासत्र, प्रश्नोत्तरे आणि विविध विषयांवरील कार्यशाळाही होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरांवर होणा-या या महोत्सवासाठी लघुपटकारांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
 
या महोत्सवासाठी लघुपटांच्या विविध वर्गवारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सामाजिक जनजागृती (सोशल अवेरनेस), आंतरराष्ट्रीय (इंटरनॅशनल), अॅनिमेशनपट, मोबाईल शूट फिल्म, जाहिरातपट (अॅडफिल्म), संगीतपट (मुझिक विडीओ) आणि माहितीपट (डॉक्युमेंटरी) अशा या सात वर्गवारीकरिता विनामूल्य ऑनलाईन प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख ५ नोव्हेंबर २०१६ आहे तर डीव्हीडी (DVDs) पाठविण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर ही आहे.
 
‘शॉर्टफिल्म शोकेस’ आणि ‘डॉक्युमेंट्री शोकेस’ या दोन टीव्ही शोच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर भाष्य आणि मनोरंजन करणाऱ्या या महोत्सवाने वेब (यु ट्यूब च्या) दुनियेमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे. ‘बीफोरयु शॉर्ट’ असा नवीन वेब शो ‘युनिव्हर्सल मराठी’ आणि ‘बीफोरयु’ चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचे मूल्य जपणा-या या महोत्सवाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे देशविदेशातून या महोत्सवाला लघुपटकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवामध्ये चित्रपट सृष्टीतल्या मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभणार आहे. लघुपटकरांना विविध विषयांवर चर्चा आणि प्रश्नोत्तरांची संधी मिळणार आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या लघुपटांचे परीक्षण या क्षेत्रातील तज्ञांकडून केले जाईल. तीन दिवसीय असलेल्या या महोत्सवात निवडक लघुपटांचे स्क्रीनिंग केले जाईल. प्रत्येक लघुपट वर्गवारीतून प्रत्येकी एक ‘बेस्ट शॉर्टफिल्म’ विजेता आणि सर्वोत्तम कामगिरी करणा-याना वैयक्तिक तांत्रिक अॅवॉर्ड (टेक्निकल अॅवॉर्ड) देऊन गौरविण्यात येईल. विजेत्यांना रोख रकमेसहित सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.या महोत्सवासाठी सर्वांनाच विनामुल्य प्रवेश असेल. पण त्यासाठी या महोत्सवाच्या वेबसाईटवर जाऊन आधीच नाव नोंद करणे आवश्यक आहे. अशी माहिती युनिव्हर्सल मराठीचे सरचिटणीस अमितराज निर्मल यांनी दिली. अधिक माहितीसाठी ९७६८९३०८५३ / ९८३३०७५७०६ या क्रमांकावर आणि www.mymumbaishortfilmfestival.com या वेबसाईटवर संपर्क साधावा. फेसबुकवरही ‘युनिव्हर्सल मराठी’च्या पेजला तुम्ही भेट देवू शकता.