testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

nashibwan
Last Modified गुरूवार, 3 जानेवारी 2019 (00:58 IST)
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक सामान्य माणूस आपल्या बायको, मुलांना घेऊन जेव्हा प्रथमच बाहेर फिरायला निघतो तेव्हा तो
मॉल मध्ये जातो. आजच्या काळात महत्त्वाची ठरत असलेल्या मॉल संस्कृतीत तो जेव्हा फिरतो तेव्हा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला 'मॉलचे' खूप अप्रूप वाटते. संपूर्ण मॉल नजरेने निहारताना त्याच्या नजरेत असलेली उत्सुकता आणि आनंद आपल्याला गाणं पाहताना जाणवते. सामान्य माणूस पैशाअभावी जो आनंद स्वतः घेऊ शकत नाही आणि परिवाराला देऊ शकत नाही. तो आनंद पैसे मिळाल्यामुळे कुटुंबाला देण्याचा प्रयत्न भाऊ कदम या गाण्यात करताना दिसत आहे. छान तयार होऊन आजूबाजूच्या लोकांना आनंदाने जोरात सांगत भाऊ आणि त्याचे कुटुंब बाहेर फिरायला जाते. मॉल फिरून झाल्यानंतर मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करताना भाऊ कदम आणि परिवार दिसत आहे. या गाण्यात दिग्दर्शकाने अगदी छोट्या छोट्या गोष्टी टिपल्या आहेत. जसे मॉल मध्ये टॉयट्रेनमध्ये बसल्यावर मुलांना सांभाळून नीट बसवताना वाटणारी भीती, हॉटेलमध्ये वेटरकडून जेवण वाढून घेताना होणारी अस्वस्थता, जेवण झाल्यावर टिशु पेपरमध्ये खडीसाखर बांधून घेणे हे सर्व बघताना आपण या गाण्याला कुठेना कुठे जोडून घेतो. या गाण्यात भाऊ कदम, मिताली जगताप - वराडकर यांचे प्रचंड बोलके दिसणारे डोळे. त्यात शाल्मली खोलगडेचा भारदस्त आवाज, सोहम पाठक यांचे अप्रतिम संगीत आणि जोडीला शिवकुमार ढाले यांचे अर्थपूर्ण शब्द. एवढे सगळे उत्तम जुळून आल्यानंतर हे गाणे पाहिल्यावर फक्त एकच प्रतिक्रिया तोंडातून निघते आणि ती म्हणजे निव्वळ अप्रतिम.
nashibwan
लँडमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती असलेला 'नशीबवान' हा चित्रपट येत्या ११ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील यांनी निर्मात्यांची धुरा सांभाळली असून प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना भाऊ कदम यांच्यासोबत मिताली जगताप - वराडकर, नेहा जोशी, राजेश शृंगारपुरे, अतुल आगलावे आदींचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

B'Day Spl: करण जौहर आपल्या खोलीत ठेवतो शाहरुख-गौरीचा फोटो, ...

national news
बॉलीवूड अॅक्टर, डायरेक्टर, प्रोड्यूसर आणि होस्ट करण जौहर 25 मे रोजी आपल्या वाढदिवस साजरा ...

कॅटरीना आणि दीपिकाला मागे सोडत 'मोस्ट डिजायरेबल वूमन' बनली ...

national news
बॉलीवूडची बिंदास आणि सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या चित्रपटांची निवड पासून लव्ह ...

अनुराग कश्यपच्या मुलीला दुष्कर्माची धमकी, मोदींना विचारले, ...

national news
लोकसभा निवडणूक निकाल 2019 मध्ये पंतप्रधान मोदींची जीत झाल्याने पूर्ण देशात आनंदाचे ...

नागिन 3 फेम पवित्रा पुनियाने साडी घालून करवले हॉट फोटोशूट, ...

national news
टीव्ही मालिका 'नागिन 3'मध्ये दिसलेली पवित्रा पुनिया सध्या आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत ...

नवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना....

national news
बायका नवर्‍याला थोड जेवून घेता का ऐवजी थोडी घेऊन जेवता का? असं म्हण्याल्यावर नवरा ...