रविवार, 28 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 1 ऑगस्ट 2019 (16:27 IST)

नचिकेतने दिला नेहाला जादुचा दिवा

neha in big boss
लक्ष्यपूर्तीसाठी आत्मविश्वास आणि महत्वाकांक्षा जितकी महत्वाची असते, अगदी तितकाच महत्वाचा असतो आपल्या साथीदाराचा विश्वास आणि त्याचे पाठबळ ! बिगबॉस मराठी सीजन २ च्या घरातील 'धाकड गर्ल' खेळाडू नेहा शितोळेच्या पाठीदेखील तिचा पती नचिकेत पूर्णपात्रे खंबीर उभा असल्याचे पाहायला मिळते. नुकत्याच पार पडलेल्या फेमिली वीकमध्ये नचिकेतने बिगबॉसच्या घरात घेतलेली सरप्राईज एंट्री भाव खाऊन गेली. नेहासाठी एक सुंदर कविता बोलत नचिकेतने घरात प्रवेश केला, आणि नेहाच्या भावनेचा बांध तुटला. नेहा आणि नचिकेतची हि भेट घरच्या सदस्यांना भाऊक करून गेली. आपल्या मिश्किल आणि मनमोकळ्या स्वभावाने त्याने घरातल्या सर्व सदस्यांचे मन जिंकली खरी, पण त्याबरोबरच नेहासोबत घरच्या सदस्यांचे झालेले रुसवे फुगवेदेखील त्याने दूर केले.

नेहाला फुल ऑन सपोर्ट करणाऱ्या नचिकेतने त्याच्यासोबत एक जादुई दिवा देखील आणला होता. अर्थात, हा दिवा नेहाला स्पर्धेच्या पुढील टप्प्यात जाण्यासाठी आणि तिचे मनोबल वाढविण्यासाठी नचिकेत दिला आहे. इजिप्त टूरला गेले असताना या दाम्पत्यांनी हा दिवा विकत घेतला होता, त्याची आठवणदेखील त्याने यावेळी तिला करून दिली. तर मग, या दिव्यातला प्रोत्साहनरुपी जीनमुळे नेहाला बिगबॉसच्या आगामी टास्कमध्ये कशापद्धतीने विजयश्री मिळवणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे !