1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2019 (14:54 IST)

लवकरच ‘ठाकरे’ चित्रपटाचा सिक्वल येणार

The sequel to the movie 'Thackeray' will be coming soon
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवसैनिकांपासून अनेक चाहत्यांनी  ‘ठाकरे’ चित्रपटाच्या पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता लवकर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निर्मितीत ‘ठाकरे’ चित्रपटाचा सिक्वल तयार करण्यात येणार आहे. ठाकरे चित्रपटाच्या सिक्वलमध्ये कलाकारांची संपूर्ण वेगळी टीम असणार आहे. विशेष म्हणजे ‘ठाकरे’ सिक्वलच्या दिगदर्शनाची धुरा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि बॉलिवूडमध्ये वावर असलेल्या दिग्ददर्शकाकडे देण्यात येणार आहे.
 
‘ठाकरे’ चित्रपटाचा पहिला भाग 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अनेकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला होता. या चित्रपटात शिवसेना स्थापनेपासून ते राज्यात युतीची सत्ता येण्यापर्यंतच्या प्रमुख घटना दाखवण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता लवकरच ठाकरे चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात राजकारणात झालेला उदय, त्यानंतर झालेली पक्षातील बंड यासह अनेक प्रमुख घटना प्रेक्षकांसमोर आणली जाण्याची शक्यता आहे.