शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

‘कान्स’ महोत्सवासाठी ‘पठार’ मराठी लघुपटाची निवड

प्रसिद्ध ‘कान्स’ (Cannes)  चित्रपट महोत्सवासाठी ‘पठार’ या मराठी लघुपटाची निवड झाली आहे. लेखक सतीश तांबे यांच्या कथेवर आधारित ‘पठार’ लघुपट आहे. सतीश तांबे याच्या ‘पठारावर अमर’ या कथेवर आधारित ‘पठार’ लघुपट आहे. ‘पठार’ची निर्मिती, दिग्दर्शन आणि पटकथा निखिलेश चित्रे यांची आहे.

स्वप्निल शेटे यांनी या लघुपटाचं छायाचित्रण आणि संपादन केलं असून, त्यात राहुल तिवरेकर, तुषार पवार, केवल नागवेकर, हरिता पुराणिक आणि मानसी पुंडलीक यांच्या प्रमुखभूमिका आहेत. कान्स चित्रपट महोत्सवात हा लघुपट ‘शॉर्ट फिल्म कॉर्नर’ या विभागाअंतर्गत दाखवला जाणार आहे. डिसेंबर महिन्यात मुंबईत झालेल्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात ‘पठार’ला रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. ‘पठार’चं प्रदर्शन लवकरच विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.