बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017 (10:19 IST)

वर्षाअखेरीस प्रदर्शित होणार राजन

वीआर मुव्हीज प्रस्तुत आणि भारत सुनंदा दिग्दर्शित बहुचर्चित 'राजन' ह्या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर आणखीन एक नवे पोस्टर लाँच करण्यात आले. 'राजन' या शिर्षकावरुनच सिनेवर्तुळात दबादबा निर्माण करणाऱ्या या सिनेमात अभिनेता राकेश बापट मध्यवर्ती भूमिकेत आहे. आतापर्यंत चार्मिंग बॉयच्या भूमिकेत दिसलेला हा राकेश, या सिनेमात मात्र 'एंग्री यंग मेन' साकारताना दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या नव्या पोस्टरवरील त्याचा एंग्री लूक दिसून येत असून, मुंबईच्या तत्कालीन १९९३ सालच्या गुंडागिरीवर हा सिनेमा बेतलेला आहे. ह्या सिनेमाचे नाव जरी 'राजन' असले तरी, तो कोणत्याही व्यक्तिगत आयुष्यावर बेतलेला नसून, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्याचे उद्दिष्ट्य यात आहे. तत्कालीन मुंबईची चाळसंस्कृती आणि त्यातून फुलत जाणारी प्रेमकथादेखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 'राजन' सिनेमाचे वामन पाटील,  सुरेखा पाटील आणि दिप्ती बनसोडे यांनी निर्मिती केली असून, कुणाल नैथानी यांनी सह्निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. वर्षाअखेरीस हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.