बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2023 (16:06 IST)

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखेच्या अध्यक्षपदी प्रभाकर (गोट्या) सावंत यांची एकमताने निवड

Prabhakar Sawant
गेली अनेक वर्षे नाट्यक्षेत्रात व्यवस्थापक व सूत्रधार म्हणून कार्यरत असलेले सर्वांच्या परिचयाचे लाडके व्यक्तिमत्व श्री. प्रभाकर (गोट्या) सावंत यांची बोरिवली शाखेच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
 
Prabhakar Sawant
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बोरिवली शाखेच्या कार्यकारी समितीची २०२३-२०२८ पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीत एकूण १७ जणांनी आवेदन पत्र दिले होते, त्यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आणि कार्यकारी समितीची सदस्यांची संख्या पंधराच असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडून आलेल्या सदस्यांनी एकमताने ठराव पास करून श्री. प्रभाकर (गोट्या) सावंत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बोरिवली शाखेची कार्यकारी समिती पुढील प्रमाणे : - प्रभाकर (गोट्या) सावंत – अध्यक्ष, मोहन परब – उपाध्यक्ष, विश्वनाथ माने – उपाध्यक्ष, हेमंत बिडवे - प्रमुख कार्यवाह, सुरेश दळवी – कोषाध्यक्ष, दामोदर टेंबुलकर – कार्यवाह, प्रशांत जोशी – कार्यवाह, समिती सदस्य - प्रफुल कारेकर, राजेंद्र पिसाट, चंद्रकांत मोरे, संदीप कबरे, माधुरी राजवडे, समीर तेंडुलकर, विजय चव्हाण, सुप्रिया चव्हाण यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बोरिवली शाखेची पंचवार्षिक निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून विजय लाड आणि सहाय्यक श्री संदीप ठीक यांनी काम पाहिले. 

- Deepak Jadhav