बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 मार्च 2018 (16:43 IST)

न्यूड चा ट्रेलर झाला रिलीज

नसीरुद्दीन शहा यांच्या आवाजातील, ‘हर इन्सानमें खुदा है और खुदामें इन्सान’या वाक्याने सुरुवात दिग्दर्शक रवी जाधव यांच्या बहुचर्चित न्यूड ट्रेलर रिलीज केला आहे. चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. तर या चित्रपटाच्या नावावरूनही अनेकांच्या मनात कुतूहल आहे, या सिनेमाला मात्र इफ्फीमधून वगळला होते त्यामुळे न्यूड चांगलाच चर्चेत राहिला आहे. हा चित्रपट चित्रकारांसाठी न्यूड मॉडेलचं काम करणाऱ्या स्त्रीच्या आयुष्यावर केंद्रित आहे. या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता चांगलीच ताणून धरली आहे.
 
ट्रेलरमध्ये मानवी जीवनातले अनेक रंग पाहायला मिळत असून, आयुष्याचा संघर्ष करताना न्यूड मॉडेल म्हणून काम कराव्या लागणाऱ्या दोन स्त्रियांची ही कथा आहे असे प्रथम दर्शनी समोर येतंय. झी स्टुडिओज निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.