मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (10:57 IST)

आर्ची या अभिनेत्यासोबत गेली डिनर डेटला, अफेअरची चर्चा रंगली

Rinku Rajguru and Aakash Thosar at dinner date
photo: instagram
अभिनेत्री रिंकू राजगुरूनं केवळ मराठी सिनेमातच नव्हे तर तर हिंदीतही आपली ओळख निर्माण केली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमात तिनं साकारलेली आर्ची ही भूमिका चाहत्यांच्या मनात अजूनचही आहे. तिला आजही रिंकूऐवजी आर्ची नावाने जास्त ओळखली जाते. आजपर्यंत आपण तिच्या सिनेमा आणि अभिनयबद्दल ऐकलं असेल पण सध्या चर्चा आहे तिच्या अफेअरच्या चर्चांविषयी. रिंकू राजगुरू कोणाला तरी डेट करतेय अशा चर्चेला उधाण आलं. काय आहे यामागील कहाणी जाणूया-
 
रिंकू सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. नुकतीच तिने एक पोस्ट केली आहे. ज्यात ती तिच्या डिनर डेटविषयी बोलत आहे. या डिनर डेटला तिच्यासोबत एक अभिनेताही दिसत आहे. आणि तो इतर कोणी नसून परश्या आहे. होय, म्हणजेच सैराट सिनेमातला आकाश ठोसर. आकाश तिचा खूप चांगला मित्र असून काही दिवसांपूर्वी हे दोघे डिनर डेटला गेले होते. तेव्हाचे फोटो दोघांनी पोस्ट केले आहेत. 
 
आकाशने पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे की,''खूप खाल्लं यार. उद्या जरा जास्त कार्डिओ करायला लागणार''. तसेच रिंकू राजगुरूने तिचा गाडीतला व्हिडीओ पोस्ट करत लिहिले आहे की,''लवकरच पुन्हा भेटू''.
पण त्यांचे हे फोटो पाहून त्यांच्यातील अफेअरच्या चर्चांना मात्र उधाण आलं आहे. चाहत्यांना ही जोडी तशीच खूप पसंत आहे आणि त्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 
 
रिंकू राजगुरू सैराटनंतर 'मेकअप','कागर' या मराठी सिनेमात तर '१००','अनपॉज्ड','२०० हल्ला हो' या वेबसिरीजमध्ये झळकली आहे. त्यानंतर आता ती 'छुमंतर' या मराठी सिनेमात दिसणार आहे. तर आकाश ठोसर 'एफ यू-फ्रेंडशीप अनलिमिटेड' या सिनेमात झळकला आहे. तसेच तो 'लस्ट स्टोरीज','१९६२ द वॉर इन दी हिल्स' या सीरिजमध्ये दिसला आहे. यानंतर आता तो 'घर','बंदूक बिर्यानी' या सिनेमातही दिसणार आहे.
 
सैराट चित्रपटातील आर्ची आणि परशाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. त्यामुळे त्यांना एकत्र बघून चाहते खूप खूश आहेत. ते दोघेही नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन अभिनीत झुंड या चित्रपटात झळकणार आहेत.
photo: social media