मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 10 एप्रिल 2022 (10:23 IST)

अभिनेत्री सुहास जोशी, राजीव नाईक यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

अभिनय क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानासाठी, २०१८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार अभिनेत्री सुहास जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान केला गेला.

संगीत, नाट्य, नृत्य, लोककला या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, पं. सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक यांच्यासह 44 कलावंतांना वर्ष 2018 चे संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले होते. अकादमी पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या कलावंतांना प्रत्येकी एक लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते.
 
संगीत नाटक अकादमीची जनरल कौन्सिल आणि राष्ट्रीय संगीत, नृत्य व नाटक अकादमी यांची गुवाहाटी येथे 26 जून 2019 रोजी झालेल्या बैठकीत या 44 कलावंतांना हा सन्मान देण्याचे ठरवले गेल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने तेव्हा सांगितले होते.