शूटिंगसाठी मुहूर्तच मिळेना - सारंग साठ्ये

pandu
Last Modified बुधवार, 2 ऑक्टोबर 2019 (11:36 IST)
सारंग साठ्ये आणि अनुषा नंदा कुमार दिग्दर्शित ‘पांडू’ ही वेबसिरीज एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. पोलिसांच्या जीवनावर आधारित ही वेबसिरीज सहा भागांची असून, यात पोलिसांच्या खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना रंजक आणि विनोदी पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. या वेबसेरीजच्या प्रमोशनदरम्यान दिग्दर्शक सारंग साठ्ये याने चित्रीकरण करताना घडलेले काही किस्से सांगितले. त्यातलाच एक सारंगला कायम स्मरणात राहील, असा किस्सा म्हणजे शेवटच्या भागाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला किस्सा.

या वेबसिरीजचा शेवटचा भाग 'भारत बंद' या विषयावर आधारित आहे. याबद्दल सारंग सांगतो, "जेव्हा आम्ही या भागाचे चित्रीकरण सुरु केले तेव्हा अनेक अनिश्चित आणि मजेशीर गोष्टी घडत गेल्या तर काही योगायोगही घडले. खरंतर ज्या दिवशी हा भाग चित्रित करायला सुरुवात केली. नेमका त्याच दिवशी खरोखरच 'भारत बंद' होता. त्यामुळे आमचे पहिल्या दिवसाचे शूटिंग रद्द करावे लागले. आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा चित्रीकरणाची तयारी केली, मात्र त्यादिवशी आदल्या दिवशी झालेल्या 'भारत बंद'चा निषेध म्हणून बंद पाळण्यात आला. पुन्हा एकदा चित्रीकरण रद्द करावे लागले.

तिसऱ्यांदा जेव्हा आम्ही चित्रीकरणाची तयारी केली तेव्हा आम्हाला शूटिंगसाठी आवश्यक असलेली पोलीस व्हॅनच उपलब्ध
नव्हती. आम्ही बुक केलेली व्हॅन दोन दिवस शूटिंग रद्द झाल्याने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या चित्रीकरणासाठी देण्यात आली होती. पुन्हा एकदा आमचे चित्रीकरण रद्द झाले. सलग तीन दिवस शूटिंग रद्द झाल्याने खरंतर आम्ही खूप त्रस्त झालो होतो. अथक प्रयत्नानंतर अखेर चौथ्या दिवशी ठरलेल्या शेड्युलनुसार आमचे चित्रीकरण पार पडले, तेही उत्तमरित्या आणि अपेक्षित अशा सर्व गोष्टी या भागात आम्हाला दाखवता आल्या. हा प्रसंग खरंतर आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यावेळी हसावे की रडावे, अशी आमची स्थिती झाली होती. मात्र या अनुभवातून खूप गोष्टी शिकता आल्या. ''


'पांडू' या वेबसिरीजमध्ये सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के यांच्या प्रमुख भूमिका असून या वेबसिरीजला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म
असलेल्या एमएक्स प्लेअर मराठी ओरिजनल्सवर ही
वेबसिरीज विनामूल्य पाहता येईल.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

रक्षाबंधनाच्या निमित्ताने जॅकी भगनानीने एका सुंदर ...

रक्षाबंधनाच्या निमित्ताने जॅकी भगनानीने एका सुंदर संदेशद्वारे व्यक्त केल्या भावना
अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी आपल्या परोपकारी कामसोबतच समाजासाठी खूप काही करत आहे. ...

बाप्परे, सु शांतने गुगलवर 'हे' शब्द सर्च केले होते

बाप्परे, सु शांतने गुगलवर 'हे' शब्द सर्च केले होते
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता सुशांतने ...

अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची रक्षाबंधनच्या मुहूर्तावर ...

अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची रक्षाबंधनच्या मुहूर्तावर घोषणा
रक्षाबंधनच्या मुहूर्तावर (Raksha bandhan 2020) अभिनेता अक्षय कुमारने (Actor Akshay Kumar) ...

दिशाच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाले

दिशाच्या आत्महत्येशी संबंधित फोल्डर चुकून डिलीट झाले
सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांकडून याप्रकरणी कसून ...

अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराबाहेर गोळीबार ?

अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराबाहेर गोळीबार ?
अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराबाहेर गोळीबार झाला आहे. कंगना सध्या तिच्या कुल्लू येथील ...