गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (08:39 IST)

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सातारा येथील फलटण तालुक्यात 'माझी आई काळूबाई' या मालिकेच्या शुटिंग दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. १६ सप्टेंबरला त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 
 
गेल्या महिन्याभरापासून या मालिकेचं शुटिंग सुरू आहे. आशालता वाबगावकर यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याचं समजतं.  सेटवर २७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर साऱ्यांची तपासणी करण्यात आली. सोनी मराठीवर 'माझी आई काळुबाई' ही मालिका लागते. या  मालिकेत  काळूबाईची भूमिका अलका कुबल यांनी साकारली आहे. अलका कुबल यादेखील सेटवर होत्या.