1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 2 डिसेंबर 2019 (16:52 IST)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि स्पृहा जोशी पहिल्यांदाच 'विक्की वेलिंगकर' सिनेमातून एकत्र झळकणार...

Actress Sonali Kulkarni and Spraha Joshi will be seen together for the first time in the movie 'Vicky Wellingkar' ...
अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार व प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवा प्रस्तुत मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी टीजर, ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यात सोनाली कुलकर्णी आणि स्पृहा जोशी यांची एकत्र झलक देखील ट्रेलरच्या माध्यमातून बघायला मिळाली. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमातील जेव्हा पहिल्यांदा स्पृहा आणि सोनालीचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले तेव्हापासूंनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पहायला मिळत आहे. या आघाडीच्या दोन्ही अभिनेत्री पहिल्यांदा एकत्र या सिनेमातूनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
 
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी आपल्या अभिनयाच्या कौशल्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपले वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. दोन्ही अभिनेत्रींच्या नावावर अनेक प्रसिद्ध चित्रपट आहेत. विशेष बाब अशी की या आघाडीच्या दोन अभिनेत्री ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना प्रेक्षकांना दिसणार आहेत. त्याचबरोबर या दोघींचा एकत्र अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली असून या सिनेमामध्ये सोनाली कुलकर्णी आणि स्पृहा जोशी यांची नक्की भूमिका कशी आहे हे जाणून घेण्यासाठी रसिकांना ६ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागेल.
सोनाली कुलकर्णी आणि स्पृहा जोशी म्हणल्या, ‘आम्ही दोघींनी ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम केले आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे, आम्ही दोघी  खूप चांगल्या आणि जवळच्या मैत्रिणी आहोत. आम्हाला या चित्रपटात काम करताना खूप मज्जा आली. या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे अशाप्रकारच्या कथेमध्ये पहिल्यांदाच काम करत आहोत. आमचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी या चित्रपटाचे उत्तम प्रकारे दिग्दर्शन केले आहे. विक्की वेलिंगकरमध्ये आमच्या भूमिकेमध्ये विशेष गोष्ट अशी आहे की, विक्की ही विद्या शिवाय अपूर्ण आहे. ही भूमिका साकारताना आणि या चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. या चित्रपटाबद्दल आम्ही खूप उत्साही आहोत’.
 
‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेती आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची हे कथा आहे,” असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी काढले. त्यांनी यापूर्वी ‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.