मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (18:25 IST)

लग्नाचे 10 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त प्रियाची उमेशसाठी खास पोस्ट

उमेश कामत आणि प्रिया बापट हे चित्रपट सृष्टीतील गोड जोडपं म्हणून प्रख्यात आहे. प्रिया आणि उमेशच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली असताना प्रियाची उमेशसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हे जोडपं सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतं .
प्रिया आणि उमेश यांनी बरोबर बरोबर चित्रपटात देखील काम केले आहेत.त्या व्यतिरिक्त आणि काय हवं ? या वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. उमेश आणि प्रियाच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाले आहे.या निमित्ताने  प्रियाची उमेश साठी  एक खास भेट म्हणून तिने आपल्या इंस्टाग्रामवर लग्नात घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने लिहिले आहे की माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवस.माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय.आमच्या लग्नातील सर्वात चांगला क्षण.या व्हिडिओमध्ये प्रिया आणि उमेश उखाणा घेताना दिसत आहे.उमेश ने उखाणा घेतला होता.की ''कांती जिची सुरेख रूप जिचे अलवार.. प्रिया माझी रत्नजडित तलवार''.प्रियाने उखाणा घेतला ''सारेगमपच्या सुरांचा लागलाय नवा साज..उमेश माझा जुनाच गडी पण नवं माझं राज्य.'' सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. युजर्स ने दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे दोघे 2011 मध्ये वैवाहिक बंधनात अडकले होते.