शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मे 2019 (13:52 IST)

रिंकूच्या नव्या चित्रपटाचा टीजर लॉन्च

सैराट या पहिल्याच चित्रपटामुळे रिंकू राजगुरू स्टार बनली. तिला केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभर लोकप्रियता मिळाली. सैराट या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक बॉलिवूडधील अनेक सेलिब्रेटींनी देखील केले होते. रिंकूला एकाच चित्रपटामुळे प्रचंड स्टारडम मिळाले. तिच्या फॅन्सची संख्या प्रचंड आहे. या चित्रपटानंतर अनेक वर्षांनी तिचा कागर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटाला सैराट इतकी लोकप्रियता मिळाली नसली तरी या चित्रपटातील रिंकूच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. कागर या चित्रपटानंतर रिंकूचा पुढचा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली होती. रिंकूच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तिचा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचे नाव मेकअप असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश पंडितने केले असून या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला. या चित्रपटाच्या टीजरमध्ये रिंकूचे एक वेगळेच रूप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या टीजरमध्ये रिंकू दारू पिऊन बडबडताना दिसत असून या चित्रपटातही ती एका ग्रामीण भागातील मुलीचीच भूकिा साकारत असल्याचे हा टीजर पाहून लक्षात येत आहे.