गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जून 2020 (12:07 IST)

लॉकडाउननंतर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट

कोरोनामुळे ओढावलेल्या संकटामुळे देशात गेल्या दोन-अडीच महिन्यांनासून लॉकडाउन सुरु आहे. या काळात सारं काही बंद असल्यामुळे कलाविश्वातील कामकाजही ठप्प झालं होतं. आता अनलॉकमुळे पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टी  जोमाने उभी राहिली असून 'मनाचे श्लोक' या चित्रपटाचं चित्रीकरण जवळपास पूर्ण होत आलं आहे. त्यामुळे लॉकडाउननंतर मराठी कलाविश्वातील ' मानचे श्लोक' हा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' या चित्रपटाचं जवळपास संपूर्ण चित्रीकरण पूर्ण झालं होतं. मात्र या चित्रपटातील काही महत्त्वाच्या भागांचं शेवटच्या दोन दिवसांमध्ये चित्रीकरण करायचं होतं. त्यानंतर हा संपूर्ण चित्रपट तयार होणार होता. मात्र अखेरच्या या दोन दिवसांमध्येच लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. अनलॉक होताच टीमने  योग्य काळजी घेत हे चित्रीकरण पूर्ण केलं आहे.