मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जून 2020 (08:52 IST)

सोन्याची होतेय जोरदार खरेदी, लॉकडाऊनमुळे कोणताही फरक नाही

देशात सध्या लॉकडाऊन असतानाही केरळमध्ये सोन्याच्या बुकिंगमध्ये वाढ झाली आहे. कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरमण यांच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या मोसमातही सर्व दुकाने बंद होती, त्यामुळे बुकिंगमध्ये वाढ झाल्याने त्यांना संशोधन करण्यास प्रेरित केले. रमेश यांच्या म्हणण्यानुसार, कल्याण ज्वेलर्स एक विशेष योजना चालवत आहेत, जिथे ग्राहक लग्नाच्या एक महिन्यापूर्वी दागिने बुक करू शकतात. त्यांनी सांगितले की, ज्या ग्राहकांनी ५ लाखांचे सोने बुक केले होते, ते वाढवून आता १० लाखांपर्यंतचे सोने खरेदी करत आहेत.
 
कल्याणरमन यांच्यामते, लॉकडाऊनमुळे लोकांचा आउटडोअर कार्यक्रम, मेजवानी, फोटोशूट यावरील खर्च कमी होत आहे. पण त्यांच्याकडे बजेटचे पैसे आहेत, म्हणून त्या पैशांनी ते सोने खरेदी करत आहेत.
 
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे गुंतवणूकदार खूपच वाढले आहेत. यापूर्वी एप्रिलमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये ७३१ कोटींची गुंतवणूक झाली होती. मात्र मार्चमध्ये गोल्ड ईटीएफमधून १९५ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते.