शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (15:55 IST)

विद्यापीठात पुन्हा वाजणार नाटकाची तिसरी घंटा..! 22 ऑक्टोबर रोजी 'वाघाची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग

जवळपास गेली दीड वर्षे बंद असणारी नाटकाची घंटा आता वाजणार आहे. यानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या वतीने ‘वाघाची गोष्ट’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे.
 
मार्च 2020 पासून टाळेबंदी आणि इतर अनेक निर्बंधामुळे महाराष्ट्रभर सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांचे प्रयोग जवळजवळ ठप्प झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही एकत्र येत आपली कला सादर करता येत नव्हती. मात्र आता हे निर्बंध शिथिल केल्याने  दि. 22 आक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता सावित्रीबाई फुले पुण विद्यापीठ मधील नामदेव सभागृह येथे ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रमांतर्गत ‘वाघाची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आलेला आहे.
 
मूळ इटालियन भाषेतील हे नाटक दारिओ फो या नोबेल पुरस्कार विजेत्या नाटकाकाराने लिहीलेले असून त्याचा मराठी अनुवाद विनोद लव्हेकर यांनी केलेले आहे. या नाटकाचे दिग्दर्शन महेश खदारे यांनी केलेला आहे. तर शुभम साठे आणि ऋत्विक तळवलकर हे या नाटकात अभिनय करत आहेत. नाटकाचा कालावधी एक तास आहे.
 
या प्रसंगी महाराष्ट्रातल्या नाटकघरांची सुरवात म्हणून तिसरी घंटा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार देणार आहेत. शासन नियमांनुसार सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. सदर विनामुल्य नाटयप्रयोगाचा जास्तीत जास्त रसिकांनी अस्वाद घ्यावा असे आवाहन ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रविण भोळे यांनी केले आहे.