मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2017 (10:34 IST)

" मैं जुनूनी हूँ , क्योंकि जुनून मेरे सर पर सवार है ! I

" मैं जुनूनी हूँ , क्योंकि जुनून मेरे सर पर सवार है ! I am mad but I am alive... yes I admit I am mad but alive.. Yes choice is ours to be mad .."

रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित "अनहद नाद - Unheard Sounds of Universe " या बहुभाषिक नाटका मधील हा सवांद .... जुनून हा ध्येयाच्या दिशेने असावा ...आपल्या समोर ध्येय ठेवून त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणे म्हणजेच त्या ध्येयासाठी दिलेली कुर्बानी ...आणि त्या कुर्बानीचे मोल म्हणजेच पिढ्यानू पिढ्या तो व्यक्ति ' विचार ' रूपाने जिवंत राहतो ...भगत सिंग हा असाच ध्येय वेडा तरुण होता ...आणि तो आज विचार म्हणून जिवंत आहे ...मेल्यानंतरही .

ध्येयाला साध्य केल्यानंतर या पावसात भिजण्याची मज्जा खूप वेगळी आहे. ही जाणीव अनहद नाद चा performance झाल्यानंतर मला झाली.आकाशातून पडणाऱ्या पावसाचे थेंब अगदी कपाळावर पडू लागले आणि आम्ही कलाकार गोलाकार उभे राहून डोळे बंद करून या सृजनात्मक क्षणाला जगू लागलो .एक कलाकार म्हणून स्वतःमध्ये अभिमान निर्माण झाला ...या माझ्या अंतकरणातील विश्वाला जिंकण्याचे समाधान आणि सुख मला मिळू लागले. डोळे बंद करून " हम हैं " चा आवाज आकाशाच्या दिशेने सोडला ...त्याचा वेग इतका होता की पाऊस जोर-जोरात पडू लागला ...वाटलं , काय आहे क्षण हा !!!!-..पाऊसात तर सर्व जण भिजतात आणि एक विचार घेऊन या पाऊसात भिजण्याचा आनंद केवढा मोठा आहे हे मला आज समजले ... कारण , यावेळी माझ्या मधील न्यूनगंड तोडून अनहद नाद - या जीवन प्रेरित नाटकातील नवीन संवाद पहिल्यांदा परफॉर्म करण्याचं समाधान आज मला मिळाले ...

थिएटर ऑफ रेलेवन्स ची हि प्रयोगशील प्रक्रिया, रंगभूमी ला वैचारिक रंगभूमी बनवण्यासाठी वैचारिक प्रयोग करत आहे ...